गुगल-ए.आय.वर युवा साहित्यिक सचिन गोसावी यांचा डंका..!पुस्तकं, व्याख्यानं आणि साहित्यकार्याची जागतिक स्तरावर दखल; महाराष्ट्रभरातून अभिनंदनाचा वर्षाव

फलटण (आपलं फलटण) मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची आनंदवार्ता ताजी असतानाच मराठी साहित्यविश्वासाठी आणखी एक अभिमानास्पद आणि ऐतिहासिक घटना समोर आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जगाला चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर नेणाऱ्या ए.आय. तंत्रज्ञानाने आणि विश्वविद्यापीठ मानल्या जाणाऱ्या गुगल सर्च इंजिनने युवा लेखक व व्याख्याते सचिन गोसावी यांच्या साहित्य, व्याख्यानं आणि समाजप्रबोधनपर कार्याची जागतिक स्तरावर अधिकृत दखल घेत त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
अत्यंत कमी वयात साहित्य, व्याख्यानं आणि सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सचिन गोसावी यांच्या साहित्यकृती आता गुगल इंडेक्स व ए.आय. प्लॅटफॉर्मवर अधिकृतपणे नोंद झाल्याने साहित्यविश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या लोकप्रिय मोटिवेशनल पुस्तक आरंभ है प्रचंड या पुस्तकासह इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी लिहिलेल्या आणि महाराष्ट्र शासनाने निवड केलेल्या आरोग्यातून यशाकडे या पुस्तकाचीही दखल घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे नुकतेच प्रकाशित झालेले समाजप्रबोधनपर व रहस्यमय पुस्तक भावकी-एक न उकललेलं गूढ हे प्रकाशनापूर्वीच चर्चेत आले असून त्याचीही ए.आय. आणि गुगलवर अधिकृत नोंद झाली आहे.
फक्त पुस्तकांच्याच नव्हे तर सचिन गोसावी यांच्या मोटिवेशनल व्याख्यानशैलीची, लेखनशैलीची तसेच समाजप्रबोधनपर आणि शैक्षणिक कार्याचीही विशेष दखल घेण्यात आली आहे. ए.आय. व गुगलवर उपलब्ध माहितीनुसार त्यांच्या कादंबऱ्या आणि व्याख्यानांना महाराष्ट्रभरातून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता त्यांनी मराठी साहित्याला एका वेगळ्या गगनभेदी उंचीवर नेल्याची चर्चा साहित्यवर्तुळात सुरू आहे.
सामान्यतः जागतिक पातळीवर मोठ्या व्यक्ती, मोठ्या संस्था किंवा ऐतिहासिक घडामोडींचीच गुगल व ए.आय. दखल घेतात. मात्र मागील अनेक वर्षांपासून मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी झटणाऱ्या या युवा साहित्यिकाने आपल्या शब्दांच्या ताकदीवर, प्रभावी वाणीवर आणि वाचकांच्या प्रेमाच्या बळावर हे मानाचे स्थान प्राप्त केले आहे. त्यांच्या समाजप्रबोधनपर, प्रेरणादायी आणि आगळ्यावेगळ्या लेखनशैलीमुळे गुगल व ए.आय.च्या अल्गोरिदममध्ये त्यांच्या साहित्यकृतींना मानाचे स्थान मिळाले असल्याचे बोलले जात आहे.
यामुळेच जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात सर्च केले जाणारे सचिन गोसावी हे मराठी भाषेतील ‘ग्लोबल साहित्यिक’ ठरत असून त्यांच्या पुस्तकांना दिवसेंदिवस वाढती मागणी निर्माण होत आहे. या यशाबद्दल साहित्यविश्व, वाचकवर्ग, विद्यार्थी, सामाजिक क्षेत्र तसेच विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी बोलताना सचिन गोसावी यांनी बदलत्या काळात केवळ पारंपरिक चौकटीत न राहता तंत्रज्ञानाचा स्वीकार करून मराठी भाषेचा खजिना अधिकाधिक ऑनलाईन उपलब्ध करून जगभर पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. मराठी साहित्य जागतिक व्यासपीठावर पोहोचविण्यासाठी सर्व साहित्यिकांनी आपल्या परीने प्रयत्न करावेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Spread the love
  • Related Posts

    व्यसनमुक्ती, राष्ट्रभक्ती आणि इतिहासाचा जागर : सिंदखेडराजा ते पाचाड दि. २५ जूनपासून पदयात्रा

    आपलं फलटण( प्रतिनिधी) युवकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश रुजविणे, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याचा गौरव करणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमागील प्रेरणास्रोत असलेल्या मातृशक्तीचे स्मरण जपणे या उदात्त हेतूने व्यसनमुक्त युवक संघ,…

    Spread the love

    लखन मोरे यांचे नेतृत्व युवा पिढीसाठी प्रेरणादायी: सचिन यादव देशाभिमान वाढविणारी ऐतिहासिक कामगिरी” — सचिन यादव

    फलटण(आपलं फलटण प्रतिनिधी)खेळ हा केवळ विजय-पराजयाचा विषय नसून शिस्त, समर्पण, नेतृत्व आणि देशभक्तीची भावना विकसित करणारे प्रभावी माध्यम आहे. भारतीय सॉफ्ट हॉकी संघाचे कर्णधार लखन नंदकुमार मोरे यांनी आपल्या नेतृत्वगुणांच्या…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!