भोंसले जयंतीचा क्रीडा जल्लोष; विद्यार्थ्यांच्या जिद्दीला सलाम — डॉ. पी. एच. कदम यांचा दमदार संदेश!

फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) :
येथील प्रियदर्शिनी ज्ञान प्रबोधिनीच्या विधी महाविद्यालयात क्रीडा स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्याने अक्षरशः जल्लोषाचे रूप धारण केले. संस्थापक बॅरिस्टर राजा भोंसले यांच्या जयंतीचे औचित्य साधत आयोजित या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडा कौशल्याची दमदार छाप उमटवली.
या बहारदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. नितीन भैय्या भोंसले होते, उपाध्यक्ष मा. श्री. शंतनू भोंसले यांची विशेष उपस्थिती तर प्रमुख पाहुणे म्हणून मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम हे होते.
प्रास्ताविकात रणजित शेळके यांनी क्रीडा स्पर्धांचा स्पष्ट करून “विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकांपुरते ज्ञान मर्यादित न राहता त्यांच्यात जिद्द, संघभावना आणि स्पर्धात्मकता रुजवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले
प्राचार्य डॉ. पी. एच. कदम म्हणाले,
“खेळ म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर जीवनाला दिशा देणारी शक्ती आहे. क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांतूनच विद्यार्थ्यांचा खरा सर्वांगीण विकास घडतो. खेळाडूवृत्तीच जीवनातील प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची ताकद देते!”
यावेळी स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. विजेत्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उपस्थितांचा जल्लोष या सोहळ्याला विशेष उंची देऊन गेला.
प्रा. मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. जिया इनामदार व रणजित शेळके यांनी सूत्रसंचालन केले, अॅड. शितल सोनवणे यांनी आभार मानले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह क्रीडाप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
चौकट:
🔸 भोंसले जयंतीनिमित्त क्रीडा स्पर्धांचा जल्लोष
🔸 डॉ. पी. एच. कदम यांचा विद्यार्थ्यांना जोशपूर्ण संदेश
🔸 गुणवंत खेळाडूंचा दिमाखदार सन्मान
🔸 जिया इनामदार-रणजित शेळके यांचे रंगतदार सूत्रसंचालन
🔸 अॅड. शितल सोनवणे यांचे मनोगतपूर्ण आभार

Spread the love
  • Related Posts

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर फलटण पंचायत समिती; रिक्त पदांचा वाढता डोंगर बीडीओ, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त; जूनअखेर आणखी दोन अधिकारी सेवानिवृत्त

    प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर फलटण पंचायत समिती; रिक्त पदांचा वाढता डोंगरबीडीओ, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त; जूनअखेर आणखी दोन अधिकारी सेवानिवृत्त आपलं फलटण( प्रतिनिधी )फलटण पंचायत समितीचा…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा
    error: Content is protected !!