फलटण (आपलं फलटण) : रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन, फलटण यांच्या वतीने तसेच डॉ. बारकीज होमिओपॅथिक, ईश्वरपूर (इस्लामपूर) यांच्या सहकार्याने रविवारी, दि. ५ एप्रिल रोजी मोफत तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिर सकाळी १०.३० वाजता नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय, फलटण येथे होणार असून विविध आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. विशेषतः कॅन्सरमुळे होणाऱ्या तीव्र वेदनांवर मोफत औषधे देण्यात येणार असून रुग्णांना अल्पावधीत दिलासा मिळण्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
याशिवाय, चष्म्यापासून कायमची मुक्तता, डोळ्यांचे विकार, मोतीबिंदू व काचबिंदू यांसारख्या समस्यांवरही मार्गदर्शन व औषधोपचार दिले जाणार आहेत. तसेच जुनाट सर्दी, दमा, खोकला, वारंवार कफ होणे, धाप लागणे यांसारख्या श्वसनविकारांवरही मोफत औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
त्वचारोगांमध्ये फंगल इन्फेक्शनसह विविध त्वचा विकारांवरही उपचार केले जाणार असून हे शिबिर पूर्णपणे मोफत आहे. तपासणीनंतर रुग्णांना औषधेही विनामूल्य देण्यात येणार आहेत.
दरम्यान, या शिबिरासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत नाव नोंदणी करणे अनिवार्य असून पूर्वनोंदणी नसलेल्या रुग्णांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
या उपक्रमासाठी नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय, हॉटेल ब्रह्मा प्युअर व्हेज, फलटण तसेच सामाजिक कार्यकर्ते मोहनराव पोतेकर यांचे सहकार्य लाभले आहे.
अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ९८६०००४७३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






