फलटण नगरपरिषदेत नामांतरावरून वादळी चर्चा; बहुमताने ठराव मंजूर

फलटण (आपलं फलटण )फलटण नगर परिषदेच्या पहिल्या विशेष सर्वसाधारण सभेत शहर विकासाशी संबंधित 46 विषयांवर चर्चा झाली, मात्र विषय क्रमांक 9 — नामांतराचा मुद्दा — सर्वाधिक वादग्रस्त ठरला. सत्ताधारी व विरोधी गटात जोरदार शाब्दिक चकमक झाली. अखेर नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी महापुरुषांची नावे पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत ठराव बहुमताने मंजूर केला.
या निर्णयानुसार नवीन पालिका इमारतीचे नाव ‘महाराजा मालोजीराव नाईक निंबाळकर भवन’ चे ‘छत्रपती शिवाजी महाराज भवन’, ‘श्री रामराजे नाईक निंबाळकर सभागृह’ चे ‘क्रांतीसूर्य महात्मा फुले सभागृह’ आणि ‘श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सभागृह’ चे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह’ असे नामांतर करण्यात आले. तसेच ‘श्रीमंत रामराजे शॉपिंग सेंटर’ चे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शॉपिंग सेंटर’, जुन्या इमारतीस ‘छत्रपती सईबाई महाराणी भवन’, बारामती चौकास ‘माता रमाई चौक’, रिंग रोड परिसरास ‘छत्रपती संभाजीराजे नगर’ आणि फिरंगाई देवी मंदिर परिसरास ‘फिरंगाई देवी नगर’ अशी नवी नावे देण्यात आली.
    शिवसेनेच्या नगरसेविका श्वेता तारळकर यांनी आधीच मंजूर व अंमलात आलेले ठराव बदलणे कायदेशीरदृष्ट्या अयोग्य असल्याचा आक्षेप घेतला. नगरसेवक विकास काकडे व पप्पू शेख यांनी त्यांना पाठिंबा दिला. तर राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन अहिवळे यांनी ठरावाच्या बाजूने आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला.
    याचबरोबर, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद कामांना एनओसी देण्यापूर्वी सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक करण्याच्या प्रस्तावावर अनिकेतराजे यांनी कायदेशीर आक्षेप घेतला. मात्र नगराध्यक्षांनी पारदर्शकता व दुबार कामे टाळण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे सांगत तोही ठराव बहुमताने मंजूर केला.
    सभेत शहर हद्दवाढ, स्टेडियम, नमो उद्यान, रस्ते, सीसीटीव्ही, अभय योजना, वीज, स्वच्छता, स्मशान सुशोभीकरण आदी विषयांवर सकारात्मक चर्चा व ठोस निर्णय घेण्यात आले. नामांतरावरून सभा वादळी ठरली असली तरी रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली. सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Spread the love
  • Related Posts

    सासकलमध्ये ‘एल निनो’ जनजागृती शेतकरी शिवार फेरी उत्साहात

    फलटण (आपलं फलटण)कृषी विभागाच्या वतीने सासकल (ता. फलटण, जि. सातारा) येथे ‘एल निनो’ विषयावर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी शेतकरी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. बदलत्या हवामान परिस्थितीत शेतीचे नियोजन कसे करावे,…

    Spread the love

    फलटण पंचायत समितीची मासिक सभा संपन्न; विविध विभागांचा आढावा, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

    फलटण ( आपलं फलटण)पंचायत समिती फलटणची मासिक सभा नुकतीच पं.स.च्या सभागृहात सभापती शिवांजली भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.सभेच्या प्रारंभी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सासकलमध्ये ‘एल निनो’ जनजागृती शेतकरी शिवार फेरी उत्साहात

    सासकलमध्ये ‘एल निनो’ जनजागृती शेतकरी शिवार फेरी उत्साहात

    फलटण पंचायत समितीची मासिक सभा संपन्न; विविध विभागांचा आढावा, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

    फलटण पंचायत समितीची मासिक सभा संपन्न; विविध विभागांचा आढावा, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

    भव्य रोषणाई, कोलंबिया लायब्ररीची प्रतिकृती अन्‌ प्रेरणादायी मिरवणूक; फलटणमध्ये आंबेडकर जयंती महोत्सवाची दिमाखदार सांगता

    भव्य रोषणाई, कोलंबिया लायब्ररीची प्रतिकृती अन्‌ प्रेरणादायी मिरवणूक; फलटणमध्ये आंबेडकर जयंती महोत्सवाची दिमाखदार सांगता

    प्रधानमंत्री आवास योजना २.० चा लाभ घ्या; नगराध्यक्ष समशेरसिंह ना.निंबाळकर

    प्रधानमंत्री आवास योजना २.० चा लाभ घ्या; नगराध्यक्ष समशेरसिंह ना.निंबाळकर

    विडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विविध उपक्रमांनी परिसर दणाणला

    विडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विविध उपक्रमांनी परिसर दणाणला
    error: Content is protected !!