अडीच लाख पशुधनाच्या चाऱ्याचे आतापासूनच नियोजन करा; आमदार सचिन पाटील यांची मागणी!फलटणच्या संभाव्य पाणी व चारा टंचाईचा प्रश्न पालकमंत्र्यांसमोर मांडला; टंचाईग्रस्त गावांत टँकर, विहीर अधिग्रहण आणि हातपंपांद्वारे पाणीपुरवठ्याची उपाययोजना करण्यावर भर

आपलं फलटण :सातारा प्रतिनिधी :

अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता लक्षात घेता फलटण तालुक्यातील संभाव्य पाणी व चारा टंचाईचा प्रश्न आमदार सचिन पाटील यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत प्रभावीपणे मांडला. फलटण तालुक्यातील सुमारे अडीच लाख पशुधनासाठी आगामी काळात चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच आगाऊ नियोजन करावे, तसेच टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, विहीर अधिग्रहण, हातपंप व बोअरवेलच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था उभी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य पाणी व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आमदार सचिन पाटील यांनी फलटण तालुक्यातील परिस्थिती मांडताना, टंचाई निर्माण झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा संभाव्य संकटाचा पूर्वअंदाज घेऊन प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

फलटण तालुक्यात सध्या सुमारे अडीच लाख पशुधन असून उपलब्ध सुका व हिरवा चारा पुढील तीन महिन्यांपुरताच पुरेल, अशी वस्तुस्थिती त्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिली. पावसाची परिस्थिती प्रतिकूल राहिल्यास पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे कृषी विभागाने आतापासूनच चारा पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, आवश्यक बियाणे उपलब्ध करून द्यावे आणि चारा उत्पादन वाढविण्यासाठी जनजागृती करावी, अशी मागणी त्यांनी केली. वेळेत नियोजन झाल्यास पशुपालकांवरील संभाव्य आर्थिक संकटाची तीव्रता कमी करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फलटण तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून जलजीवन मिशनसह विविध पाणीपुरवठा योजनांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आमदार सचिन पाटील यांनी मांडली. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने गावनिहाय परिस्थितीचा आढावा घेऊन आधीच उपाययोजना निश्चित कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, तेथे गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे, हातपंप व बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता वाढविणे, तसेच परिसरातील उपलब्ध पर्यायी पाणीस्रोतांचा शोध घेऊन त्यांचा वापर करण्यावर भर देण्यात आला.
केवळ नियोजन नव्हे, प्रत्यक्ष अंमलबजावणी महत्त्वाची!
पाणी आणि चारा टंचाईचा प्रश्न ऐनवेळी निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आतापासूनच प्रशासनाने सज्ज राहणे आवश्यक आहे. अपूर्ण पाणीपुरवठा योजनांना गती देणे, चारा उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे आणि संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये पाण्याचे नियोजन करणे या बाबींना प्राधान्य देण्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली.
आमदार सचिन पाटील यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्यांवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सकारात्मक चर्चा केली. नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांना संभाव्य टंचाईच्या काळात अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक उपाययोजनांबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या बैठकीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे, आमदार अतुलबाबा भोसले, आमदार महेशदादा शिंदे, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार धैर्यशीलदादा कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजूभैया भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Spread the love
  • Related Posts

    समाजप्रबोधन आणि कीर्तनसेवेचा वारसा जपणारे मल्हारी गाढवे पाटील यांचा आज अमृतमहोत्सवी सोहळा!

    काळज येथे ७५ व्या वाढदिवसानिमित्त स्नेहमेळावा; माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती फलटण : आपलं फलटण वृत्तसेवा : जीवनातील ७५ वर्षांचा प्रवास म्हणजे अनुभव, संघर्ष,…

    Spread the love

    फलटणमध्ये उद्या १५ वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन; शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची नांदीही रंगणार! ‘छत्रपती शिवरायांचे अलौकिकत्व’ विषयावर प्रा. अरुण घोडके यांचे व्याख्यान; स्थानिक लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन, कथाकथन आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

    फलटण : आपलं फलटण :थोर नेते व साहित्यिक स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त फलटणमध्ये बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी १५ वे स्व. यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन आणि महाराष्ट्र साहित्य…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    समाजप्रबोधन आणि कीर्तनसेवेचा वारसा जपणारे मल्हारी गाढवे पाटील यांचा आज अमृतमहोत्सवी सोहळा!

    समाजप्रबोधन आणि कीर्तनसेवेचा वारसा जपणारे मल्हारी गाढवे पाटील यांचा आज अमृतमहोत्सवी सोहळा!

    फलटणमध्ये उद्या १५ वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन; शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची नांदीही रंगणार! ‘छत्रपती शिवरायांचे अलौकिकत्व’ विषयावर प्रा. अरुण घोडके यांचे व्याख्यान; स्थानिक लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन, कथाकथन आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

    फलटणमध्ये उद्या १५ वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन; शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची नांदीही रंगणार!                   ‘छत्रपती शिवरायांचे अलौकिकत्व’ विषयावर प्रा. अरुण घोडके यांचे व्याख्यान; स्थानिक लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन, कथाकथन आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

    फलटणमध्ये २५ नोव्हेंबरपासून ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला मिळणार व्यासपीठ!आमदार सचिन पाटील, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण

    सामान्य कार्यकर्त्यापासून राज्यसभेपर्यंतचा संघर्षमय प्रवास!खा. रामराव वडकुते यांच्या निधनाने बहुजन चळवळीचा बुलंद आवाज हरपला.

    सामान्य कार्यकर्त्यापासून राज्यसभेपर्यंतचा संघर्षमय प्रवास!खा. रामराव वडकुते यांच्या निधनाने बहुजन चळवळीचा बुलंद आवाज हरपला.

    एका दिवसात ३७ फेको नेत्रशस्त्रक्रिया; लायन्स मुधोजी आय हॉस्पिटलची उल्लेखनीय कामगिरी! अर्जुन घाडगे, चंद्रकांत कदम यांच्यासह डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेतून फलटणच्या आरोग्यसेवेत नवा मानदंड

    एका दिवसात ३७ फेको नेत्रशस्त्रक्रिया; लायन्स मुधोजी आय हॉस्पिटलची उल्लेखनीय कामगिरी!                        अर्जुन घाडगे, चंद्रकांत कदम यांच्यासह डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेतून फलटणच्या आरोग्यसेवेत नवा मानदंड

    संत नामदेव महाराज सायकल वारी आज फलटण मुक्कामी; १६० रायडर्सचा सहभाग

    संत नामदेव महाराज सायकल वारी आज फलटण मुक्कामी; १६० रायडर्सचा सहभाग
    error: Content is protected !!