दिवाळीपूर्वी दत्त इंडियाकडून ११,७८५ शेतकऱ्यांना १५.७९ कोटींचे वाटप गत हंगामातील उसाच्या उर्वरित बिलापोटी प्रतिटन २०० रुपये जमा; शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा

फलटण: आपलं फलटण

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, साखरवाडी या कारखान्याने सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या उर्वरित बिलापोटी प्रतिटन २०० रुपये याप्रमाणे एकूण १५ कोटी ७९ लाख ६७ हजार ५८९ रुपयांची रक्कम ११ हजार ७८५ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर वर्ग केली आहे. गुरुवारी (दि. २९) करण्यात आलेल्या या रकमेच्या वितरणामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.
दि. २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या शेतकरी मेळाव्यात कारखाना व्यवस्थापनाने दसऱ्यानंतर उर्वरित बिल देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही रक्कम वितरित करण्यात आली. ऊस उत्पादकांना वेळेत त्यांच्या हक्काची रक्कम मिळावी, या उद्देशाने व्यवस्थापनाने हा निर्णय घेतल्याचे मुख्य प्रशासनाधिकारी अजितराव जगताप यांनी सांगितले. “शेतकरी हा साखर कारखानदारीचा कणा असून, त्याच्या हिताला प्राधान्य देणे हेच आमचे समाजकारण आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
शेतकरी मेळाव्यात उर्वरित बिलासह आगामी हंगामातील ऊसलागवडीचे नियोजन, अधिक उत्पादन देणाऱ्या ऊस जाती, प्रतिएकरी उत्पादन व टनेज वाढविण्याचे तंत्र आणि कारखान्याचे आगामी लागवड धोरण यावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे ऊस उत्पादकांना आर्थिक व्यवहारांसोबतच उत्पादनवाढीसाठी आवश्यक माहितीही मिळाली.
यावेळी फायनान्स जी.एम. अमोल शिंदे, केन मॅनेजर सदानंद पाटील, शेतकी अधिकारी रमेश बागणवर, दिगंबर माने, युनियन सेक्रेटरी राजेंद्र भोसले, पै. संतोष भोसले, सुहास गायकवाड, पोपटराव भोसले आणि ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्यात संबंधित रक्कम जमा झाली आहे की नाही, याची खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love
  • Related Posts

    समाजप्रबोधन आणि कीर्तनसेवेचा वारसा जपणारे मल्हारी गाढवे पाटील यांचा आज अमृतमहोत्सवी सोहळा!

    काळज येथे ७५ व्या वाढदिवसानिमित्त स्नेहमेळावा; माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती फलटण : आपलं फलटण वृत्तसेवा : जीवनातील ७५ वर्षांचा प्रवास म्हणजे अनुभव, संघर्ष,…

    Spread the love

    फलटणमध्ये उद्या १५ वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन; शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची नांदीही रंगणार! ‘छत्रपती शिवरायांचे अलौकिकत्व’ विषयावर प्रा. अरुण घोडके यांचे व्याख्यान; स्थानिक लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन, कथाकथन आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

    फलटण : आपलं फलटण :थोर नेते व साहित्यिक स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त फलटणमध्ये बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी १५ वे स्व. यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन आणि महाराष्ट्र साहित्य…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    समाजप्रबोधन आणि कीर्तनसेवेचा वारसा जपणारे मल्हारी गाढवे पाटील यांचा आज अमृतमहोत्सवी सोहळा!

    समाजप्रबोधन आणि कीर्तनसेवेचा वारसा जपणारे मल्हारी गाढवे पाटील यांचा आज अमृतमहोत्सवी सोहळा!

    फलटणमध्ये उद्या १५ वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन; शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची नांदीही रंगणार! ‘छत्रपती शिवरायांचे अलौकिकत्व’ विषयावर प्रा. अरुण घोडके यांचे व्याख्यान; स्थानिक लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन, कथाकथन आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

    फलटणमध्ये उद्या १५ वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन; शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची नांदीही रंगणार!                   ‘छत्रपती शिवरायांचे अलौकिकत्व’ विषयावर प्रा. अरुण घोडके यांचे व्याख्यान; स्थानिक लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन, कथाकथन आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

    फलटणमध्ये २५ नोव्हेंबरपासून ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला मिळणार व्यासपीठ!आमदार सचिन पाटील, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण

    सामान्य कार्यकर्त्यापासून राज्यसभेपर्यंतचा संघर्षमय प्रवास!खा. रामराव वडकुते यांच्या निधनाने बहुजन चळवळीचा बुलंद आवाज हरपला.

    सामान्य कार्यकर्त्यापासून राज्यसभेपर्यंतचा संघर्षमय प्रवास!खा. रामराव वडकुते यांच्या निधनाने बहुजन चळवळीचा बुलंद आवाज हरपला.

    एका दिवसात ३७ फेको नेत्रशस्त्रक्रिया; लायन्स मुधोजी आय हॉस्पिटलची उल्लेखनीय कामगिरी! अर्जुन घाडगे, चंद्रकांत कदम यांच्यासह डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेतून फलटणच्या आरोग्यसेवेत नवा मानदंड

    एका दिवसात ३७ फेको नेत्रशस्त्रक्रिया; लायन्स मुधोजी आय हॉस्पिटलची उल्लेखनीय कामगिरी!                        अर्जुन घाडगे, चंद्रकांत कदम यांच्यासह डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेतून फलटणच्या आरोग्यसेवेत नवा मानदंड

    संत नामदेव महाराज सायकल वारी आज फलटण मुक्कामी; १६० रायडर्सचा सहभाग

    संत नामदेव महाराज सायकल वारी आज फलटण मुक्कामी; १६० रायडर्सचा सहभाग
    error: Content is protected !!