आपलं फलटण | फलटण प्रतिनिधी
साखरवाडी येथील श्रीदत्त इंडिया प्रा. लि. साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी आयोजित मोळीपूजन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यंदाच्या हंगामात उच्चांकी गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी आवश्यक यंत्रणा, तोडणी आणि वाहतूक व्यवस्था सज्ज झाली आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली.

विधान परिषदचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर, श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महंत विद्रास शाममुंदरशास्त्री, श्रीदत्त इंडिया उद्योगाचे चेअरमन प्रतीक उपळकर आणि संचालक जितेंद्र धायगुडे यांच्यासह कारखान्याचे संचालक चेतन धार, परीक्षित रुपारेल आणि करण रुपारेल यांच्या उपस्थितीत मोळीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मान्यवरांनी गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कारखान्याच्या विस्तारीकरणानंतर यंदा गाळप क्षमता वाढली असून, वाढीव क्षमतेनुसार गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे. ऊस तोडणी, वाहतूक आणि इतर आवश्यक बाबींची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे कारखाना सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होणार आहे.
श्रीदत्त इंडिया ही कंपनी अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला ऊस वेळेत गाळपासाठी आणणे आणि त्यांना सहकार्य करणे, याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. यंदाचा हंगाम शेतकरी, ऊसतोडणी कामगार आणि कारखान्यासाठी समाधानकारक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन नितीन भोसले, व्हाइस प्रेसिडेंट भारत तावरे, चांदोबा साखर कारखान्याचे टेक्निकल युनिट हेड अमोद पाल, केन मॅनेजर सदानंद पाटील, दिवाकर माने, रमेश बाणगवार, एचआर संजय भुसनार, नितीन नाईकनवरे, डीजीएम अजित कदम, डेप्युटी चीफ इंजिनिअर किशोर फडतरे, नितीन रणवरे, विशाल साखरे, नितीन होळे, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे राजेंद्र भोसले, पोपट भोसले, संतोष भोसले, महेश भोसले, राजेंद्र गायकवाड, केन यार्ड इन्चार्ज एस. के. भोसले, ट्रान्सपोर्ट इन्चार्ज नितीन भोसले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, सुरक्षा अधिकारी अजय कदम, सुरेश नाना भोसले, संजय जाधव, मातोश्री कन्स्ट्रक्शनचे संजय भोसले, जयराम नाना भोसले, सुरेश भोसले यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.




