फलटण : ग्रामीण विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणाऱ्या धोम-बलकवडी उजवा कालव्याच्या कि.मी. १२८ ते १४७ मधील बंदिस्त नलिका वितरण व्यवस्थेच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज (दि. ६) सायंकाळी ४ वाजता मौजे नाईकबोमवाडी, ता. फलटण येथे आयोजित करण्यात आला आहे.
या भूमीपूजन शुभारंभ माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून, आमदार सचिन पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
क्ष कार्यक्रमास ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील, सातारा जिल्हा बँकेचे संचालक शिवकुमार खंडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर यांच्यासह उद्योजक राम निंबाळकर, फलटणचे नगराध्यक्ष समशेर दादा नाईक निंबाळकर, कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, पंचायत समिती फलटणच्या सभापती शिवांजली भोसलेसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या प्रकल्पामुळे नाईकबोंबवाडी परिसरातील शेतीसाठी पाणी वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम होण्यास मदत होऊन ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. सोहळ्यास परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






