फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) : भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने सन २०२६-२७ चे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून उल्लेखनीय शैक्षणिक कार्य करणाऱ्या २९ शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
क्ष शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कार्यातून इतर शिक्षकांना प्रेरणा मिळावी, हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा तथा निवड समितीच्या अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ३ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत प्राप्त प्रस्तावांचे मूल्यांकन करण्यात आले. जिल्ह्यातील शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पात्र शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
सातारा जिल्ह्याने शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांकात देशात दहावा, तर राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश तसेच ‘माझी शाळा, आदर्श शाळा’ उपक्रमात जिल्ह्यातील शाळांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शाळांमधील भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे शिक्षण विभागाने नमूद केले आहे.
फलटणच्या माधुरी सोनवलकर यांचा गौरव
या पुरस्कारासाठी फलटण तालुक्यातील सरवडी येथील शिक्षिका माधुरी काशिनाथ सोनवलकर यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे फलटण तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुरस्कारप्राप्त शिक्षक
मृणाल धनंजय जाधव (लोणंद मुलींची शाळा, खंडाळा), माधुरी काशिनाथ सोनवलकर (सुरवडी, फलटण), सागर रामचंद्र जाधव व केशर सुनील माने (दहिवडी नं. १, माण), वृषाली अरुण घोरपडे (कुमठे नं. १, कोरेगाव), विजयकुमार किसन भुजबळ (सुभाषनगर, कोरेगाव), माधुरी प्रशांत निकम (गणेशस्थळ, कोरेगाव), वैशाली हनुमंत बागाव (सुभाषनगर, कोरेगाव), सागर कृष्णात चव्हाण (सासुर्वे, कोरेगाव), रूपाली मधुकर सुतार (पवारवाडी-दरुज, खटाव), जयमला सुभाष चव्हाण (लावंघर, सातारा), अनुपमा किरण दाभाडे (मांडवे, सातारा), रचना अमोल पवार (काळोशी, सातारा), सारिका वैभव डांगे (अतीत, सातारा), प्रशाली सुधीर विसापुरे (भाटरमळी, सातारा), अंकुश बाळू केळगणे (मोळेश्वर, महाबळेश्वर), सुनिता प्रताप कामटे (डेरेवाडी, जावली), वैशाली राजेंद्र पवार (गुढे, पाटण), शुभांगी सोमनाथ गुजर (कुमठे, पाटण), तानाजी रामचंद्र पवार (झाकडे, पाटण), संदीप उत्तम कोरडे (कोळेवाडी, कराड), प्रांजली प्रकाश नलावडे (डेळेवाडी, कराड), प्रदीप महादेव रवलेकर (मुनावळे, कराड), माधुरी सूर्यकांत जाधव (उंब्रज-मुले, कराड), राम शंकराव चाळकापुरे (घारेवाडी नं. २, कराड), लता वसंत कुंभार (खोडशी, कराड), सविता सचिन क्षीरसागर (ओझर्डे, वाई), सीमा सुभाष डेरे (कवठे, वाई) आणि दीपक मनोहर कासवेद (केंजळ, वाई) यांची जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भैय्या भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम, महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे, कृषी व पशुसंवर्धन सभापती लता कर्णे, समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे, शिक्षण समितीचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवाडी आदींनी अभिनंदन केले.
फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन
आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…






