फलटण आपलं फलटण: प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत फलटण नगरपरिषदेच्या वतीने मंगळवारी (दि. 28) सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत BSNL कार्यालयाशेजारील नगरपरिषदेच्या सभागृहात वॉर्ड सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभांमध्ये संबंधित प्रभागातील गैरहजर, स्थलांतरित, मयत व दुबार (ASDD) मतदारांची भागनिहाय यादी वाचून दाखविण्यात येणार असून, नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रत्यक्ष पडताळणी करून आवश्यक कार्यवाही करणार आहेत.
मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक प्रभागाची ASDD यादी तयार करण्यात आली असून, नागरिकांनी तसेच बूथ लेव्हल एजंट (BLA) यांनी आपल्या वॉर्ड सभेला उपस्थित राहून या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.
अचूक व अद्ययावत मतदार यादी हा सक्षम लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने SIR अभियानास सहकार्य करावे,” असेही त्यांनी नमूद केले.





