फलटण तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद; ५१ गावे टंचाईग्रस्त, ५ गावे व २७ वाड्यावस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा

आपलं फलटण( प्रतिनिधी)
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना मान्सूनपूर्व पावसाने पाठ फिरवल्यामुळे फलटण तालुक्यात पाणीटंचाईचे संकट अधिकच गंभीर बनले आहे. यंदा उन्हाळी पावसाचा पूर्णपणे अभाव राहिल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने तालुक्यातील ५१ गावे टंचाईग्रस्त घोषित केली असून त्यापैकी ५ गावे आणि २७ वाड्यावस्त्यांवर टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर आणि तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली.
विशेष म्हणजे टंचाईग्रस्त गावांमध्ये बागायती पट्ट्यातील गावांचाही समावेश असल्याने परिस्थितीची गंभीरता अधोरेखित होत आहे. मान्सूनच्या आगमनास आणखी विलंब झाल्यास किंवा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असून केवळ ९२ टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महसूल विभागाने टप्प्याटप्प्याने टंचाई जाहीर केली असून २३ फेब्रुवारी रोजी ३२ गावांचा, ३० मार्च रोजी १० गावांचा आणि ५ जून रोजी आणखी ९ गावांचा टंचाईग्रस्त यादीत समावेश करण्यात आला. धुळदेव, झिरपवाडी, सोनवडी बुद्रुक, टाकळवाडे, मानेवाडी, मिरगाव, जिंती, मलवडी, खामगाव, जावली, मिरढे, हिंगणगाव, तांबवे, सासवड, घाडगेवाडी, दुधेबावी आदी गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती गंभीर बनली आहे.
दरम्यान, ६ जूनपासून दुधेबावी व त्याखालील ११ वाड्यावस्त्या, वाघोशी, सासवड व ५ वस्त्या, मानेवाडी व ४ वस्त्या तसेच मिरढे व ७ वस्त्यांमध्ये टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. नागरिकांना तसेच जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना राबविल्या जात असल्याचे सांगण्यात आले.
मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या फलटण तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांचे लक्ष आता आकाशाकडे लागले असून, लवकरच समाधानकारक पाऊस न झाल्यास टंचाईचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Spread the love
  • Related Posts

    फलटणचे सह दुय्यम निबंधक दिपक पवार निलंबित; १,५४५ दस्तांच्या नोंदणीतील अनियमिततेच्या संशयाची चौकशी सुरू. 58 दस्ता मध्ये कायद्याचे उल्लंघन?

    आपलं फलटण : प्रतिनिधीफलटण येथील सह दुय्यम निबंधक वर्ग-२ दिपक सावळा पवार यांना महाराष्ट्र शासनाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले असून त्यांच्या कार्यालयामार्फत नोंदणी करण्यात आलेल्या एकूण १,५४५ दस्तऐवजांबाबत गंभीर अनियमिततेचा…

    Spread the love

    कृषीकन्यांचे डिजिटल शेतीचे धडे; कृषी ॲप्लिकेशनच्या प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

    आपलं फलटण: प्रतिनिधी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प कार्यक्रमांतर्गत कृषीविषयक मोबाईल ॲप्लिकेशनचे प्रात्यक्षिक सादर…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटणचे सह दुय्यम निबंधक दिपक पवार निलंबित; १,५४५ दस्तांच्या नोंदणीतील अनियमिततेच्या संशयाची चौकशी सुरू. 58 दस्ता मध्ये कायद्याचे उल्लंघन?

    फलटणचे सह दुय्यम निबंधक दिपक पवार निलंबित; १,५४५ दस्तांच्या नोंदणीतील अनियमिततेच्या संशयाची चौकशी सुरू. 58 दस्ता मध्ये कायद्याचे उल्लंघन?

    कृषीकन्यांचे डिजिटल शेतीचे धडे; कृषी ॲप्लिकेशनच्या प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

    कृषीकन्यांचे डिजिटल शेतीचे धडे; कृषी ॲप्लिकेशनच्या प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

    काळज येथे कृषीदूतांकडून डिजिटल शेती ॲप्सचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

    काळज येथे कृषीदूतांकडून डिजिटल शेती ॲप्सचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

    धुळदेव येथे कृषीकन्यांकडून गोठा स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचे प्रात्यक्षिक

    धुळदेव येथे कृषीकन्यांकडून गोठा स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचे प्रात्यक्षिक

    स्वच्छ गोठा, निरोगी जनावरे; कृषीदूतांचे विठ्ठलवाडीत मार्गदर्शन

    स्वच्छ गोठा, निरोगी जनावरे; कृषीदूतांचे विठ्ठलवाडीत मार्गदर्शन

    शिक्षणासाठी रुजवलेले रोपटे आज वटवृक्ष; श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा ६७ वा वर्धापनदिन उत्साहात अच्युतराव खलाटे यांचे गौरवोद्गार; गुणवंतांचा सत्कार, वृक्षारोपण व बीजारोपण उपक्रमाने सोहळ्याची शोभा वाढली

    शिक्षणासाठी रुजवलेले रोपटे आज वटवृक्ष; श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा ६७ वा वर्धापनदिन उत्साहात अच्युतराव खलाटे यांचे गौरवोद्गार; गुणवंतांचा सत्कार, वृक्षारोपण व बीजारोपण उपक्रमाने सोहळ्याची शोभा वाढली
    error: Content is protected !!