श्रीराम कारखान्याची विशेष सभा शांततेत; श्रीदत्त इंडियाला कारखाना चालविण्यास मंजुरी विरोधकांच्या सूचनांनंतर “सर्वांना विश्वासात घेऊन कारखाना चालवू” : संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण ( आपलं फलटण प्रतिनिधी) श्रीराम सहकारी साखर कारखाना यांची विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. १८ मे) दुपारी १ वाजता उत्साहपूर्ण आणि तणावपूर्ण वातावरणात पार पडली. सभेमध्ये कारखाना श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना चालविण्यास देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.
सभेमध्ये नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी ठरावाला समर्थन देतानाच भविष्यातील निर्णय विरोधकांनाही विश्वासात घेऊन घ्यावेत, तसेच पुढे चालविण्यास घेतल्या जाणाऱ्या इतर संस्थांचा आर्थिक बोजा कारखाना किंवा सभासदांवर पडू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर उत्तर देताना संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी “यापुढे सर्वांना विश्वासात घेऊनच कारखान्याचे कामकाज केले जाईल,” असे स्पष्ट केले.
विशेष सभेची घोषणा झाल्यापासून सत्ताधारी व विरोधकांमध्ये सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप सुरू होते. सभेदरम्यान माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, शिवरूपराजे खर्डेकर तसेच ॲड. नरसिंह निकम यांनी पूर्वीचा करार मध्यंतरी रद्द झाल्याने कारखाना व सभासदांचे नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. मंत्री समिती व कोल्हापूर खंडपीठाच्या सूचनांचे पालन झाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. यासोबतच सुमारे ४४ कोटी रुपयांच्या नुकसानीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला.
या आरोपांना उत्तर देताना संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांकडून सभासदांची दिशाभूल केली जात असल्याचा दावा केला. सभासद व कामगारांचे हित लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “सभासदांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
सभेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकी व जोरदार जुगलबंदी पाहायला मिळाली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सभास्थळी अक्षरशः पोलिस छावणीचे स्वरूप निर्माण झाले होते. प्रवेशासाठी सभेची नोटीस आणि आधारकार्ड तपासूनच सभासदांना प्रवेश दिला जात होता.
उन्हाचा तीव्र तडाखा असूनही सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. सत्ताधारी राजे गटाकडून रामराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपकराव चव्हाण, नगरसेवक ॲड. अनिकेतराजे नाईक निंबाळकर तसेच सत्यजीतराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.
कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. पूर्वीचा करार मध्यंतरी रद्द झाल्याने सभासद व कामगारांचे नुकसान होऊ नये, यासाठी शरयू कारखाना आणि श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये श्रीदत्त इंडियाकडून सुमारे साडेसहा कोटी रुपयांचे भाडे मिळणार असल्याने त्यांना कारखाना चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
सभेचे प्रास्ताविक चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी केले. आभार प्रदर्शन सुखदेव बेलदार यांनी मानले. यावेळी व्हाइस चेअरमन नितीन भोसले, माजी सभापती रेश्माताई भोसले, पांडुरंग गुंजवटे यांच्यासह संचालक मंडळ, सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
  • Related Posts

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    फलटण (पुढारी वृत्तसेवा ) स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि फलटण शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धुळदेव (ता. फलटण) परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून ४ किलो ६९…

    Spread the love

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    फलटण (आपलं फलटण )‘फलटण एज्युकेशन सोसायटी’ संचलित स्वायत्त आणि ‘NAAC A’ दर्जा तसेच ‘NBA’ मान्यता प्राप्त ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण’च्या वतीने ३ जून रोजी भव्य ‘मिनी मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
    error: Content is protected !!