श्रीराम साखर कारखान्याची आज विशेष सभा; भागीदारी करार रद्द करण्यावर निर्णय सभासदांनाच मिळणार प्रवेश

फलटण( आपलं फलटण) श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सोमवार, दि. १८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असून या सभेत कारखान्याच्या भवितव्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर निर्णय होणार आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
सभेमध्ये हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथील कल्लाप्पाणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांच्यासोबत दि. १ मार्च २०२२ रोजी करण्यात आलेला भागीदारी करार रद्द करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयाकडे कारखान्याच्या सभासदांचे लक्ष लागले आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या दि. ८ जानेवारी २०२० च्या शासन निर्णयानुसार ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ (EOI) प्रक्रियेद्वारे कारखाना, अर्कशाळा तसेच देशी-विदेशी मद्य विभाग सहकारी किंवा खासगी तत्त्वावर चालविण्याबाबतही सभेत विचारविनिमय होणार आहे.
कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर यांनी सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. सभासद असलेल्या प्रत्येक सहकारी संस्थेने सभेसाठी अधिकृत प्रतिनिधीचे नाव पंचकमिटीकडे लेखी स्वरूपात १५ मेपर्यंत कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, ही सभा केवळ सभासदांसाठीच मर्यादित ठेवण्यात आली असून सभासदांव्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडे बंदोबस्ताची मागणी करण्यात आली असून त्यासंदर्भातील पत्रही देण्यात आले आहे. विनापरवाना प्रवेशाचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
विशेष सूचनेनुसार, गणपूर्तीअभावी सभा तहकूब झाल्यास त्याच दिवशी अर्ध्या तासाने त्याच ठिकाणी पुन्हा सभा घेण्यात येणार असून त्यावेळी गणपूर्तीची आवश्यकता राहणार नसल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

Spread the love
  • Related Posts

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    आपलं फलटण: मुंबई वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता…

    Spread the love

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!