महिलांच्या सक्षमीकरणासाठी BIS चे जनजागृती व प्रशिक्षण शिबिर उत्साहात

फलटण (आपलं फलटण) रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने दि. १६ मे २०२६ रोजी फलटण नगर परिषद अंतर्गत आत्मनिर्भर शहर स्तर संघ येथे भारतीय मानक ब्युरो (Bureau of Indian Standards – BIS) यांच्या सहकार्याने स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांसाठी जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
महिलांना गुणवत्ता, सुरक्षितता व प्रमाणित उत्पादनांविषयी माहिती देणे तसेच आरोग्य, सुरक्षितता आणि दैनंदिन वापरातील वस्तूंविषयी जागरूक करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या प्रशिक्षणामध्ये खेळण्यांची सुरक्षितता व इलेक्ट्रिक खेळणी, बालकांचे पोषण व अन्न भेसळ, फीडिंग बाटल्यांचा सुरक्षित वापर, कचरा वर्गीकरण व बायोगॅस, मासिक पाळीतील स्वच्छता, बालसंगोपन, वैद्यकीय वस्त्र उत्पादने, आरोग्य साधने तसेच स्वयंपाकघरातील भांडी, प्रेशर कुकर, गॅस स्टोव्ह, मातीची भांडी व फ्रीज यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
महिलांना सुरक्षित व प्रमाणित उत्पादने कशी ओळखावीत, अन्नातील भेसळ कशी तपासावी तसेच आरोग्यदायी व स्वच्छ जीवनशैली कशी अंगीकारावी याविषयी उपयुक्त माहिती देण्यात आली. उपस्थित महिलांनी स्वतःबरोबरच समाजातही जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमासाठी भारतीय मानक ब्युरो, पुणे येथील रिसोर्स पर्सन सौ. मेघना रोंगे व सौ. रसिका पुरंदरे यांनी उपस्थित राहून प्रभावी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास स्वयंसहाय्यता बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रणरागिणी संस्थेच्या संचालिका तथा मुख्याध्यापिका श्रीमती शाहीन शेख, सौ. राझिया शेख, सचिव श्री. मारुती टकले, हिना सय्यद, अनिसा सय्यद, नगरपालिकेचे श्री. शिरतोडे सर, सौ. विद्या रिठे, सुप्रिया फडतरे, सौ. सोनल आंबोळे, सौ. रेश्मा कणसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी महिलांना नाश्ता व भेटवस्तू देण्यात आल्या. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यासाठी आणि सुरक्षित जीवनशैली अंगीकारण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Spread the love
  • Related Posts

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    आपलं फलटण: मुंबई वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता…

    Spread the love

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!