मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमुळे विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधींचे दालन खुले :उद्यानविद्या व कृषी महाविद्यालयाचा पुढाकार

फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा) : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ एप्रिल रोजी ‘मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह’चे उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणाऱ्या या उपक्रमात एकूण १२ अग्रगण्य कंपन्यांचा सहभाग असून १०२ विद्यार्थ्यांनी मुलाखतींसाठी नोंदणी केली आहे.
या प्लेसमेंट ड्राईव्हचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा जिल्हा परिषद सातारा माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी क्षेत्रातील वाढत्या रोजगार संधींची माहिती मिळणार असून कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होणार आहे. तसेच उद्योगक्षेत्राशी थेट संवाद साधण्याची आणि रोजगाराच्या संधी प्राप्त करण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर व कृषी महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच प्रा. शिंदे ए. ए. व प्रा. यादव एन. ए. यांनी समन्वयक म्हणून प्रभावी नियोजन व अंमलबजावणी केली.
‘मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह’मुळे विद्यार्थ्यांना उद्योगजगताशी थेट संपर्क साधण्याची मौल्यवान संधी मिळाली असून त्यांच्या करिअर घडविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Spread the love
  • Related Posts

    फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त विठ्ठलवाडीत दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रात्यक्षिकमहिलांना व विद्यार्थ्यांना बासुंदी निर्मितीतून उद्योजकतेचे धडे

    फलटण( आपलं फलटण ) श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत तसेच फलटण…

    Spread the love

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा
    error: Content is protected !!