सभापतीपदासाठी फलटणमध्ये ८ विरुद्ध ८ चा हाय-व्होल्टेज ड्रामा! सस्पेन्स कायम; इश्वरी चिट्टीने कोणाचे पारडे जड होणार?

फलटण ( आपलं फलटण) फलटण तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीत मतदारांनी दोन्ही प्रमुख राजकीय गटांना समान संख्याबळ देत राजकारणात नवे समीकरण निर्माण केले आहे. पारंपरिक राजे गट व खासदार गट यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजप-राष्ट्रवादी युतीला ८ जागा, तर शिवसेनेलाही ८ जागा मिळाल्याने सभापतीपदाच्या निवडीबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सभापती पदाचा निर्णयाचा सस्पेन्स कायम आहे. ईश्वरी चिठ्ठी कोणाला संधी देणार व कोणाच्या महत्वांकांक्षेवर पाणी फिरवरणार की शेवटच्या क्षणी काही राजकीय घडामोडी घडणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले असून सोमवारी (१६ मार्च) काय निकाल लागणार याची चर्चा जोमात सुरु आहे.

जि.प.,पं.स.निवडणुकीपूर्वी सत्ता आपल्या गटाकडेच येणार असल्याचा दावा करणाऱ्या दोन्ही गटांना मतदारांनी समसमान कौल देत ‘घाई करू नका, आम्हाला गृहीत धरू नका’ असा स्पष्ट संदेश दिल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. पंचायत समितीच्या १६ जागांपैकी ८ जागा भाजप-राष्ट्रवादी युतीला, तर ८ जागा शिवसेनेला मिळाल्याने स्पष्ट बहुमत कोणालाच मिळालेले नाही.निकाल जाहीर होताच कोणतीही राजकीय उलथापालथ होऊ नये यासाठी दोन्ही गटांनी आपल्या सदस्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. परिणामी नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना मतदारांचे आभार मानण्याची संधीही मिळालेली नाही. सध्या सर्व सदस्य तालुक्याबाहेर असल्याने राजकीय हालचालींना अधिकच वेग आला आहे.फलटण पंचायत समितीचे सभापतीपद इतर मागासवर्गीय (महिला) प्रवर्गासाठी राखीव असल्याने विविध पक्षांतून महिला सदस्य दावेदार म्हणून पुढे आल्या आहेत. शिवसेनेकडून विजया हनुमंत सोनवलकर (दुधेबावी), स्वाती हनुमंत आटोळे (बरड) आणि पुष्पाताई रामचंद्र चोपडे (सांगवी) या तीन दावेदार आहेत. भाजपकडून शुभांगी तुकाराम शिंदे (वाठार निंबाळकर) तर राष्ट्रवादीकडून शिवांजली विक्रमसिंह भोसले (साखरवाडी) या सभापतीपदासाठी इच्छुक आहेत.सभापतीपद आपल्याच वाट्याला यावे यासाठी सर्व इच्छुक उमेदवारांनी आपल्या पक्षनेत्यांकडे जोरदार लॉबिंग सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र दोन्ही प्रमुख गटांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष असल्याने कोणताही समझोता होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अंतिम निर्णय ईश्वरी चिठ्ठीद्वारे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.फलटणच्या राजकारणात निर्माण झालेली ही अनोखी परिस्थिती आगामी काळातील राजकीय समीकरणांना नवे वळण देणारी ठरू शकते. त्यामुळे सोमवारी होणारी सभापतीपदाची निवड ही केवळ पदासाठीची निवड नसून तालुक्याच्या भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारी ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

सभापतीपदासाठी प्रमुख पाच दावेदारविजया हनुमंत सोनवलकर – शिवसेना (दुधेबावी)स्वाती हनुमंत आटोळे – शिवसेना (बरड)पुष्पाताई रामचंद्र चोपडे – शिवसेना (सांगवी)शुभांगी तुकाराम शिंदे – भाजप (वाठार निंबाळकर)शिवांजली विक्रमसिंह भोसले – राष्ट्रवादी (साखरवाडी)

धनगर समाजाकडे सभापतीपदाची शक्यतासभापतीपदासाठी दावेदार असलेल्या पाच सदस्यांपैकी चार सदस्य धनगर समाजातील असल्याने फलटण पंचायत समितीचा पुढील सभापती धनगर समाजातील असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या निवडीकडे सामाजिक व राजकीय स्तरावरही विशेष लक्ष लागले आहे.

‘ईश्वरी चिठ्ठी’वर कोणाची राजकीय बाजी?फलटण पंचायत समितीच्या सभापती निवडीभोवती राजकीय कुतूहल शिगेला पोहोचले आहे. खासदार गटाकडून भाजपच्या उमेदवाराला संधी दिली जाणार की राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ईश्वरी चिठ्ठीसाठी पुढे केले जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू आहेत. दुसरीकडे तालुक्याच्या राजकारणातील धुरंधर म्हणून ओळखले जाणारे आमदार रामराजे कोणत्या उमेदवारावर मेहेरबान होणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दुधेबावीच्या विजया सोनवलकर यांच्यावर कृपादृष्टी राहणार, सांगवीच्या पुष्पाताई चोपडे यांना राजकीय साथ मिळणार की बरडच्या स्वाती आटोळे यांच्या नावावर ईश्वरी चिठ्ठीचा वरदहस्त पडणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. सोमवारी होणारी सभापती निवडणूक या सर्व राजकीय गणितांना अंतिम उत्तर देणार आहे.

Spread the love
  • Related Posts

    विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी सांस्कृतिक पर्वाची मेजवानी!लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा गोंधळ; भव्य दांडिया स्पर्धा अन् आकर्षक बक्षिसांची पर्वणी

    आपलं फलटण : (विडणी प्रतिनिधी) शारदीय नवरात्रोत्सव २०२६ निमित्त विडणी येथे माता-भगिनींसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेले लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा…

    Spread the love

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

     आपलं फलटण प्रतिनिधी “स्थानिक विरोधकांच्या सांगण्यावरून श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा षडयंत्राला बळी पडू नये. सभासदांच्या बळावर आणि लोकांच्या विश्वासाच्या जोरावर श्रीराम सहकारी साखर…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!