फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा) नाईकबोंमवाडी तालुका फलटण येथील तातमगिरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन नारायण कोंडीबा चव्हाण (नाना)( वय ९० )यांचे वृद्धापकाळाने निधन झाले
नाईकबोमवाडी पंचक्रोशी मध्ये ते सामाजिक राजकीय व आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत होते. महंत तातमगिरी देवस्थानचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते. आमदार रामराजे ना. निंबाळकर व राजे कुटुंबीय यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ते ओळखले जात होते. त्यांच्या पश्यात तीन मुले, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.बांधकाम व्यावसायिक धीरज चव्हाण यांचे ते आजोबा होत.






