बनावट इन्स्टाग्राम आयडीद्वारे महिलेची बदनामी; दोघे जेरबंदमॉर्फ केलेले अश्लील फोटो, व्हिडिओ प्रसारित; चार मोबाईल व सहा सीमकार्ड जप्त

फलटण ( आपलं फलटण प्रतिनिधी )बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून एका महिलेचे मॉर्फ केलेले अश्लील व आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ तसेच संदेश सोशल मीडियावर प्रसारित करून तिची बदनामी करणाऱ्या दोघांना फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले चार मोबाईल हँडसेट व सहा सीमकार्ड असा २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७८/२०२६ दाखल करण्यात आला होता. आरोपींनी बनावट इन्स्टाग्राम खाती तयार करून महिलेचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो, व्हिडिओ आणि संदेश फेसबुक, व्हॉट्सअॅप व इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रसारित केले होते. मागील सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याने पीडित महिला व तिच्या पतीला मानसिक त्रास सहन करावा लागत होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान आरोपींनी वापरलेले मोबाईल क्रमांक तसेच बनावट इन्स्टाग्राम खात्यांचा मागोवा घेण्यात आला. त्यानंतर प्रमोद सनद कांबळे (वय ३२, रा. लक्ष्मीनगर, फलटण) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने सुनिल बाळू मोहिते (वय ३४, रा. वाठार निंबाळकर, ता. फलटण) याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
तपासात सुनिल मोहिते हा व्ही-आय कंपनीचा सीमकार्ड विक्रेता असल्याचे उघड झाले. त्याने दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने सीमकार्ड उपलब्ध करून दिल्याचे तसेच त्याच सीमकार्डांचा वापर गुन्हा करण्यासाठी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर व उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक अरविंद काळे, सहायक पोलिस निरीक्षक मिटू जगदाळे, पोलिस उपनिरीक्षक दिनेश शिंदे तसेच बापूराव धायगुडे, जितेंद्र टिके, स्वप्नील खराडे, निखील गायकवाड, गणेश अवघडे, जयदीप यादव आणि अतुल बडे यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता आवश्यक
सोशल मीडियाचा गैरवापर करून व्यक्तींची बदनामी करण्याचे प्रकार वाढत असून अशा गुन्ह्यांमध्ये पोलिसांकडून तांत्रिक तपासाच्या साहाय्याने आरोपींपर्यंत पोहोचणे शक्य होत असल्याचे या कारवाईतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Spread the love
  • Related Posts

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    आपलं फलटण | फलटण प्रतिनिधीफलटण : दुष्काळसदृश परिस्थितीत तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच त्यावर प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि प्रत्येक गावाला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!