आज एक रोप, उद्या एक सावली!धुळदेव येथे कृषीकन्यांच्या पुढाकारातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

फलटण( आपलं फलटण) वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि नैसर्गिक संसाधनांवर वाढत असलेला ताण लक्षात घेता पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित करणारा उपक्रम धुळदेव (ता. फलटण) येथे उत्साहात पार पडला. “आज एक रोप, उद्या एक सावली” या संकल्पनेतून ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रम व कृषी औद्योगिक सलग्नता उपक्रम २०२६-२७ अंतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त कृषी विद्यालय, फलटण येथील कृषीकन्यांनी पर्यावरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला.

धुळदेव येथे कृषी सहाय्यक व ग्रामस्थांच्या सहभागातून झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आली. यावेळी विविध प्रकारची फळझाडे तसेच सावलीची झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. उपस्थितांना पर्यावरणाचे महत्त्व, जलसंधारण, मृदा संरक्षण, जैवविविधतेचे जतन आणि वृक्षसंवर्धन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी ग्रामस्थांनी पर्यावरण संरक्षण ही सामूहिक जबाबदारी मान्य करत अधिकाधिक वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमामुळे गावात पर्यावरणाबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण झाली असून कार्यक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.

हा उपक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, कार्यक्रम समन्वयक नीलिमा ढालपे, प्रा. नितीशा पंडित व प्रा. जी. बी. अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषीकन्या तेजश्री जाधव, वैष्णवी वाघमारे, वैभवी ननावरे, अस्मिता काटकर, सिद्धी धुमाळ, सुवर्णा धिंदाळे आणि कावेरी पळसकर यांनी विशेष परिश्रम घेतले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश कृतीतून देणारा हा उपक्रम ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला

Spread the love
  • Related Posts

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    आपलं फलटण: मुंबई वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता…

    Spread the love

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!