पुरुषोत्तम मासानिमित्त सद्गुरू शिवाजी महाराज समाधी मंदिरात धार्मिक कार्यक्रम; भाविकांना उपस्थितीचे आवाहन

फलटण(आपलं फलटण प्रतिनिधी)
पुरुषोत्तम (अधिक मास) निमित्त श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या कृपाशीर्वादाने रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी विडणी येथे श्री शंकरगीता पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरू-शिष्य परंपरेचा गौरव अधोरेखित करणारा हा आध्यात्मिक सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सद्गुरू शिवाजी महाराज समाधी मंदिर, विडणी येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या पादुकांचे दर्शन, अभिषेक, आरती, श्री शंकरगीता पारायण तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून पंचक्रोशीतील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वा. श्रींच्या पादुकांच्या आगमनाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वा. अभिषेक, दुपारी १२ वा. आरती, दुपारी १ वा. श्री शंकरगीता पारायण, सायंकाळी ५.३० वा. महाआरती आणि सायंकाळी ६ वा. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
पारायण सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी पूर्वनोंदणी करावी तसेच पारायणासाठी येताना श्री शंकरगीता ग्रंथ सोबत आणावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या धार्मिक उपक्रमासाठी मिलिंद कदम (सांगवी, बारामती), निखिल उर्फ बाबूदादा वाघमारे (धनकवडी, पुणे) आणि जयवंत कर्वे (विडणी, फलटण) यांनी पुढाकार घेतला आहे.
चौकट
श्री शंकरगीता पारायण सोहळा
दिनांक : रविवार, ७ जून २०२६

कार्यक्रम सकाळी १०.०० वा. – श्रींच्या पादुकांचे आगमन.
११.०० वा. – पादुकांना अभिषेक

  • दुपारी १२.०० वा. – आरती.
    १.०० वा. – भव्य श्री शंकरगीता पारायण
  • सायं. ५.३० वा. – महाआरती
    ६.०० वा. – महाप्रसाद
    संपर्क : 📞 मिलिंद कदम – ९५५२७११७७७
Spread the love
  • Related Posts

    फलटणचे सह दुय्यम निबंधक दिपक पवार निलंबित; १,५४५ दस्तांच्या नोंदणीतील अनियमिततेच्या संशयाची चौकशी सुरू. 58 दस्ता मध्ये कायद्याचे उल्लंघन?

    आपलं फलटण : प्रतिनिधीफलटण येथील सह दुय्यम निबंधक वर्ग-२ दिपक सावळा पवार यांना महाराष्ट्र शासनाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले असून त्यांच्या कार्यालयामार्फत नोंदणी करण्यात आलेल्या एकूण १,५४५ दस्तऐवजांबाबत गंभीर अनियमिततेचा…

    Spread the love

    कृषीकन्यांचे डिजिटल शेतीचे धडे; कृषी ॲप्लिकेशनच्या प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

    आपलं फलटण: प्रतिनिधी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प कार्यक्रमांतर्गत कृषीविषयक मोबाईल ॲप्लिकेशनचे प्रात्यक्षिक सादर…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटणचे सह दुय्यम निबंधक दिपक पवार निलंबित; १,५४५ दस्तांच्या नोंदणीतील अनियमिततेच्या संशयाची चौकशी सुरू. 58 दस्ता मध्ये कायद्याचे उल्लंघन?

    फलटणचे सह दुय्यम निबंधक दिपक पवार निलंबित; १,५४५ दस्तांच्या नोंदणीतील अनियमिततेच्या संशयाची चौकशी सुरू. 58 दस्ता मध्ये कायद्याचे उल्लंघन?

    कृषीकन्यांचे डिजिटल शेतीचे धडे; कृषी ॲप्लिकेशनच्या प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

    कृषीकन्यांचे डिजिटल शेतीचे धडे; कृषी ॲप्लिकेशनच्या प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

    काळज येथे कृषीदूतांकडून डिजिटल शेती ॲप्सचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

    काळज येथे कृषीदूतांकडून डिजिटल शेती ॲप्सचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

    धुळदेव येथे कृषीकन्यांकडून गोठा स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचे प्रात्यक्षिक

    धुळदेव येथे कृषीकन्यांकडून गोठा स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचे प्रात्यक्षिक

    स्वच्छ गोठा, निरोगी जनावरे; कृषीदूतांचे विठ्ठलवाडीत मार्गदर्शन

    स्वच्छ गोठा, निरोगी जनावरे; कृषीदूतांचे विठ्ठलवाडीत मार्गदर्शन

    शिक्षणासाठी रुजवलेले रोपटे आज वटवृक्ष; श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा ६७ वा वर्धापनदिन उत्साहात अच्युतराव खलाटे यांचे गौरवोद्गार; गुणवंतांचा सत्कार, वृक्षारोपण व बीजारोपण उपक्रमाने सोहळ्याची शोभा वाढली

    शिक्षणासाठी रुजवलेले रोपटे आज वटवृक्ष; श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा ६७ वा वर्धापनदिन उत्साहात अच्युतराव खलाटे यांचे गौरवोद्गार; गुणवंतांचा सत्कार, वृक्षारोपण व बीजारोपण उपक्रमाने सोहळ्याची शोभा वाढली
    error: Content is protected !!