साखर उद्योग संकटात; साखरेला योग्य दर मिळणे गरजेचे : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण( आपलं फलटण वृत्तसेवा ) ऊस उत्पादकांना स्पर्धात्मक दर, कामगारांना योग्य वेतन, बोनस व अन्य सवलती तसेच तोडणी-वाहतूक ठेकेदारांना वेळेवर मोबदला मिळणे यावरच साखर कारखान्यांचे यश अवलंबून आहे. मात्र साखरेला अपेक्षित दर मिळत नसल्याने संपूर्ण साखर उद्योग अडचणीत आला असून अनेक कारखाने तोट्यात चालवावे लागत असल्याची खंत श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक  संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
श्रीराम कारखान्यात 35 ते 40 वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या 14 कामगारांच्या सत्कार  समारंभात ते बोलत होते. यावेळी चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन भोसले, संचालक मंडळ, कामगार युनियनचे पदाधिकारी व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
संजीवराजे पुढे म्हणाले, साखरेच्या दरावरील धोरणांमुळे अनेक नामांकित साखर कारखाने आर्थिक संकटात सापडले आहेत. साखर उद्योग टिकविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने साखरेच्या दराबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. श्रीराम कारखाना अखंडित सुरू राहावा यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असून कामगार, सभासद आणि ऊस उत्पादकांनीही एकजुटीने साथ देणे गरजेचे आहे.
डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी सांगितले की, राजघराण्याने पुढाकार घेतल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेला श्रीराम कारखाना उभारी घेऊ शकला. गेल्या अनेक वर्षांत कामगारांची थकीत देणी, पगार व बोनस नियमितपणे देण्यात आले असून कारखाना सुरू राहण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घेण्याची गरज आहे.
कामगार युनियनचे नेते प्रेमजीत काटे यांनी, कारखाना बंद पडल्यास कामगारांवर उपासमारीची वेळ येईल, त्यामुळे शासनाने योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. तसेच कारखाना सुरू ठेवण्यासाठी कामगारांच्या वतीने आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.
समारंभात प्रेमजीत प्रभाकर काटे, नामदेव नाळे, पंढरीनाथ ढोले, विठ्ठल शिंदे, भानुदास रणदिवे, मारुती ढोले, दिलीप धुमाळ, शांतीलाल रणदिवे, रवि जाधव, संपत ननवरे, अंकुश बर्गे, मधुकर गावडे आदी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
छायाचित्र :  प्रेमजीत काटे यांचा सत्कार करताना  संजीवराजे नाईक निंबाळकर, डॉ. बाळासाहेब शेंडे व मान्यवर.

Spread the love
  • Related Posts

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण-पंढरपूर महामार्गावरील राजुरी चौफुला कुरवली पाटी ता. फलटण येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला आय-ट्वेंटी कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मंगल विठ्ठल साठे (वय 42…

    Spread the love

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घडामोडींना आता नवे वळण मिळाले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांना आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश
    error: Content is protected !!