धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

फलटण (पुढारी वृत्तसेवा ) स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि फलटण शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धुळदेव (ता. फलटण) परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून ४ किलो ६९ ग्रॅम गांजा, एक मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन असा एकूण २ लाख १ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अजित राजेंद्र कस्तुरे (वय ३१, रा. माळखांबी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि आदित्य रामचंद्र आतार (वय २५, रा. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थांच्या विक्रीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून कारवाईची आखणी केली होती.
२९ मे रोजी फलटण परिसरात कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी सुरू असताना पो.उ.नि. परितोष दातीर यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बजाज प्लॅटिना (क्र. एमएच १२ एचएक्स २६४९) या दुचाकीवरून दोन इसम धुळदेव गाव हद्दीतील रावरामोशी पुलाजवळ गांजा विक्रीसाठी येणार आहेत. माहितीची खातरजमा झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि फलटण शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने तातडीने सापळा रचला.
पोलिसांनी संशयितांना अडवून झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील पिशवीत ४ किलो ६९ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश अंमली पदार्थ आढळून आला. त्यानंतर गांजासह दुचाकी आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे फलटण तालुक्यात गांजा विक्रीचे जाळे उभारण्याचा प्रयत्न पोलिसांनी वेळेत हाणून पाडला.
या धडक कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे, नितीन शिंदे तसेच स्थानिक गुन्हे शाखा सातारा कडील पो.उ.नि. विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस अंमलदार मंगेश महाडिक, अमोल माने, अजय जाधव, जयवंत खांडके, अमित झेंडे, नवनाथ कदम, अजित कर्णे, अमित सपकाळ, ओंकार यादव, स्वप्निल दौंड, धिरज महाडिक, प्रविण पवार, संकेत निकम, विजय निकम, आनंदा भोये तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार रुक्मिणी माने, बापूराव धायगुडे, निखिल गायकवाड, गणेश आवघडे, अतुल बडे यांनी कारवाईत सहभाग घेतला कारवाईतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी अभिनंदन केले.
चौकट
गोपनीय माहिती ठरली निर्णायक
गांजा विक्रीसाठी येणाऱ्या संशयितांबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. स्थानिक गुन्हे शाखा आणि फलटण शहर पोलिसांच्या समन्वयातून करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल चार किलोहून अधिक गांजा जप्त करण्यात यश आले. अंमली पदार्थविरोधातील सातारा पोलिसांची ही कारवाई जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर मोठा आघात मानली जात आहे. यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व फलटण शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. कारवाईतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी अभिनंदन केले. 

Spread the love
  • Related Posts

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण-पंढरपूर महामार्गावरील राजुरी चौफुला कुरवली पाटी ता. फलटण येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला आय-ट्वेंटी कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मंगल विठ्ठल साठे (वय 42…

    Spread the love

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घडामोडींना आता नवे वळण मिळाले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांना आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश
    error: Content is protected !!