श्रीमंत शिवाजीराजे सीबीएसई शाळेची दहावीमध्ये ९९.१०% निकालाची दमदार झेप

फलटण (आपलं फलटण )फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित जाधववाडी येथील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल (CBSE) चा इयत्ता दहावीचा निकाल यंदा ९९.१० टक्के लागला असून, ११२ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १११ विद्यार्थी उत्तीर्ण होत प्रशालेने उज्ज्वल यश संपादन केले आहे.या यशात विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. कु. तुलसी बाळासाहेब जठार हिने ९७.६ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांकावर कु. पूर्वा पराग घनवट व रुद्रप्रताप जितेंद्र साळुंखे (९७%) यांनी संयुक्तरित्या स्थान मिळवले. तर तृतीय क्रमांकावर शिवम रविकिरण राऊत व कु. श्रावणी सोमनाथ पवार (९६.६%) यांनी संयुक्तरित्या बाजी मारली.

चौकट : गुणवत्तेची झळाळी११२ विद्यार्थ्यांपैकी ८५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून २२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विशेष बाब म्हणजे ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या ३२ विद्यार्थ्यांनी यंदाच्या निकालात आपली छाप उमटवली आहे.विद्यार्थ्यांच्या या यशामागे संस्था व शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

विद्यार्थ्यांना रुबिना बागवान, शीतल भोसले, प्रीती एकल, कै. तुकाराम शेलार, मयुरा फणसे, नूतन खेडकर व सुनिता नाईक-निंबाळकर, अर्चना काटकर व वर्षा खोमणे दीपज्योती दंडिले, चांदणी कदम व आयेशा पठाण यांचे मार्गदर्शन लाभलेया यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे ना. निंबाळकर, नियामक मंडळाचे चेअरमन रघुनाथराजे ना. निंबाळकर, संस्थेचे सेक्रेटरी संजीवराजे ना. निंबाळकर, माजी आ.दीपकराव चव्हाण संस्थेचे पदाधिकारी, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्या मिनल दीक्षित, उपप्राचार्या स्नेहल भोसले, पर्यवेक्षिका प्रियांका जठार, अर्चना काटकर, सर्व शिक्षकवृंद, पालक व मान्यवरांनी अभिनंदन केले

Spread the love
  • Related Posts

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    फलटण (पुढारी वृत्तसेवा ) स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि फलटण शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धुळदेव (ता. फलटण) परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून ४ किलो ६९…

    Spread the love

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    फलटण (आपलं फलटण )‘फलटण एज्युकेशन सोसायटी’ संचलित स्वायत्त आणि ‘NAAC A’ दर्जा तसेच ‘NBA’ मान्यता प्राप्त ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण’च्या वतीने ३ जून रोजी भव्य ‘मिनी मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
    error: Content is protected !!