माझेरीत अखंड हरिनाम सप्ताह, श्री मरीमाता मंदिर कलशारोहण सोहळ्याचे आयोजन

फलटण (आपलं फलटण) माझेरी ता. फलटण येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री मरीमाता देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व मंदिर कलशारोहण सोहळ्याचे आयोजन 23 एप्रिल ते 26 एप्रिल अखेर केले असल्याची माहिती संयोजकांनी दिली असून गावात सर्वत्र भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात दररोज विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. अखंड हरिनाम सोहळा व तुकाराम महाराज गाथा पारायण काळात काकड आरती, प्रवचन, हरिपाठ ,कीर्तन, जागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत असून दररोज अन्नदात्यांकडून अन्नदान केले जाणार आहेत. या भक्तीमय कार्यक्रमात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. अखंड हरिनाम सप्ताहातील प्रवचन व किर्तन सांगणारे ज्ञानदाते गुरुवार दि. 23 रोजी ह. भ. प. राघु बुवा महाराज दिघे. (माझेरी)यांचे प्रवचन व ह.भ.प. बापूराव महाराज लोंढे (संभाजीनगर) यांचे कीर्तन. शुक्रवार दि. 24 रोजी ह.भ.प. योगेश महाराज दिघे (माझेरी) यांचे प्रवचन व ह.भ.प. अशोक महाराज दिघे (माझेरी) यांचे कीर्तन. शनिवार दि. 25 रोजी ह.भ. प. गणेश महाराज शेलार (विडणी) यांचे प्रवचन व ह.भ.प. श्रावणताई वाघमोडे महाराज (रामिष्टेवाडी पाटण) यांचे कीर्तन रविवार दि. 26 रोजी ह.भ.प. गणेशानंद महाराज धुमाळ (धुमाळवाडी) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे या सप्ताहात विविध भजनी मंडळांनी ही सहभाग नोंदवत भक्तीरसाची उधळण केली आहे
कलशारोहण विशेष
श्री मरीमाता देवी मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व मंदिर कलशारोहण सोहळा मठाधिपती प.पू. भगवतगिरी गुरु
आनंदगिरी महाराज शिंगणापूर यांच्या शुभहस्ते गुरुवार दि. 23 रोजी पहाटे पाच ते सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान संपन्न होणार आहे. यावेळी होमहवन प्राणप्रतिष्ठापना व मंदिर कलशारोहण विधी संपन्न होणार आहेत.दुपारी एक वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन माझेरी ग्रामस्थ यांनी केले आहे
.

Spread the love
  • Related Posts

    श्रीमंत शिवाजीराजे सीबीएसई शाळेची दहावीमध्ये ९९.१०% निकालाची दमदार झेप फलटण (आपलं फलटण )फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित जाधववाडी येथील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल (CBSE) चा इयत्ता दहावीचा निकाल यंदा ९९.१०…

    Spread the love

    भव्य रोषणाई, कोलंबिया लायब्ररीची प्रतिकृती अन्‌ प्रेरणादायी मिरवणूक; फलटणमध्ये आंबेडकर जयंती महोत्सवाची दिमाखदार सांगता

    फलटण( आपलं फलटण)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात साजरा करण्यात आलेला जयंती महोत्सव यंदा भव्यतेचा नवा उच्चांक गाठत प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. शहरभर दिमाखदार रोषणाई, आकर्षक…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    माझेरीत अखंड हरिनाम सप्ताह, श्री मरीमाता मंदिर कलशारोहण सोहळ्याचे आयोजन

    माझेरीत अखंड हरिनाम सप्ताह, श्री मरीमाता मंदिर कलशारोहण सोहळ्याचे आयोजन

    फलटणमध्ये प्रभाग रचनांवर 97 हरकती सोमवारी होणाऱ्या सुनावणी कडे लक्ष

    फलटणमध्ये प्रभाग रचनांवर 97 हरकती सोमवारी होणाऱ्या सुनावणी कडे लक्ष

    गोखळी येथे निराई डेअरीच्या यशस्वी वाटचालीनंतर ‘निराई पतसंस्थे’चा शुभारंभ; ग्रामीण अर्थकारणाला नवी उभारी. सुशांत गावडे समाजहितैषि निर्णय!

    गोखळी येथे निराई डेअरीच्या यशस्वी वाटचालीनंतर ‘निराई पतसंस्थे’चा शुभारंभ; ग्रामीण अर्थकारणाला नवी उभारी. सुशांत गावडे समाजहितैषि निर्णय!

    विडणीतील श्री कालभैरवनाथ यात्रा भक्तीभाव, परंपरा आणि उत्साहात दिमाखात संपन्न

    विडणीतील श्री कालभैरवनाथ यात्रा भक्तीभाव, परंपरा आणि उत्साहात दिमाखात संपन्न

    सासकलमध्ये ‘एल निनो’ जनजागृती शेतकरी शिवार फेरी उत्साहात

    सासकलमध्ये ‘एल निनो’ जनजागृती शेतकरी शिवार फेरी उत्साहात
    error: Content is protected !!