भव्य रोषणाई, कोलंबिया लायब्ररीची प्रतिकृती अन्‌ प्रेरणादायी मिरवणूक; फलटणमध्ये आंबेडकर जयंती महोत्सवाची दिमाखदार सांगता

फलटण( आपलं फलटण)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात साजरा करण्यात आलेला जयंती महोत्सव यंदा भव्यतेचा नवा उच्चांक गाठत प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. शहरभर दिमाखदार रोषणाई, आकर्षक देखावे आणि उत्स्फूर्त जनसहभाग यामुळे संपूर्ण फलटण ‘भीममय’ झाले होते.
महोत्सवाचे अध्यक्ष भीमसैनिक हरिष काकडे (आप्पा) यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध व सुबक आयोजन करण्यात आले होते. बारामती पूल ते पंचायत समिती तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि महावीर स्तंभ परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. शहरातील प्रत्येक रस्ता, गल्ली-बोळ प्रकाशमय झाल्याने नागरिकांनी या देखाव्याचा मनमुराद आनंद लुटला.
यावर्षीच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते आंबेडकर चौकात साकारण्यात आलेले कोलंबिया युनिव्हर्सिटी लायब्ररीचे भव्य प्रतिरूप. बाबासाहेबांच्या शैक्षणिक प्रवासाचे प्रतीक असलेली ही कलाकृती नागरिकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. त्यासोबतच भगवान बुद्धांची देखणी मूर्ती आणि आकर्षक सजावट यामुळे परिसर अधिकच भारावून गेला होता.
जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीतून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा जागर मांडण्यात आला. त्यांच्या कायदेविषयक कार्यामुळे महिलांना मिळालेला सन्मान, तसेच पत्रकारितेतील योगदान यांचे प्रभावी सादरीकरण करून सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात आला.
महोत्सव काळात विविध सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. या उपक्रमांमुळे शहरात उत्साह, अभिमान आणि सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ झाली.
या यशस्वी सोहळ्यामागे शशीकांत अहिवळे, सुजल गायकवाड, स्वप्निल काकडे, आदर्श अहिवळे यांच्यासह जयंती समिती सदस्य, अथक परिश्रम लाभले. तसेच माजी नगरसेवक सनी अहिवळे व नगरसेवक सचीन (सर) अहिवळे यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.
भीमाई, पंचशील, रमाई, ‘आपलं भीम नगर’ व ‘भीम योद्धा’ मित्र मंडळांच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेत सजावट व ध्वज उभारणीचे काम पार पाडले.
एकूणच, भव्यता, शिस्तबद्धता आणि विचारप्रबोधन यांचा संगम साधणारा हा आंबेडकर जयंती महोत्सव फलटणकरांच्या स्मरणात दीर्घकाळ कोरला जाणारा ठरला.

Spread the love
  • Related Posts

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    फलटण (पुढारी वृत्तसेवा ) स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि फलटण शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धुळदेव (ता. फलटण) परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून ४ किलो ६९…

    Spread the love

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    फलटण (आपलं फलटण )‘फलटण एज्युकेशन सोसायटी’ संचलित स्वायत्त आणि ‘NAAC A’ दर्जा तसेच ‘NBA’ मान्यता प्राप्त ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण’च्या वतीने ३ जून रोजी भव्य ‘मिनी मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
    error: Content is protected !!