फलटणमध्ये ‘Magical RD’ची संगीत मैफल; ‘उषा-वैभव पुरस्कार २०२५’ने डॉ. प्रसाद जोशींचा गौरव

फलटण (आपलं फलटण)
शहरातील सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणारा दुहेरी सोहळा फलटणकरांसाठी पर्वणी ठरणार असून, ‘जोशी हॉस्पिटल प्रा. लि.’च्या सिल्व्हर जुबिली वर्षानिमित्त ‘अनुबंध कला मंडळ, फलटण’तर्फे ‘Magical RD’ हा भव्य संगीत कार्यक्रम आणि ‘उषा-वैभव पुरस्कार २०२५’ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.
रविवार, ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता सजाई गार्डन, फलटण येथे हा बहुप्रतिक्षित कार्यक्रम रंगणार आहे. ‘Magical RD’ या संगीत मैफलीत गायक प्रशांत नसेरी, सौरभ दफ्तारदार, स्वरदा गोडबोले, प्रीती जोशी हे नामवंत कलाकार सुरांची जादू सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पांचाळ करणार असून, ज्येष्ठ हार्मोनियम वादक सचिन जांभेकर यांची विशेष प्रस्तुती हा कार्यक्रमाचा आकर्षणबिंदू ठरणार आहे. अनुभवी वादकांच्या साथीने सादर होणारी ही मैफल रसिकांसाठी अविस्मरणीय ठरण्याची अपेक्षा आहे.
याच सोहळ्यात विद्या-वैभव प्रकाशन, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा ‘उषा-वैभव पुरस्कार २०२५’ प्रख्यात शल्यविशारद डॉ. प्रसाद जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील २५ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांचा सन्मान होत असून, त्यांच्या कार्याची दखल समाजभरातून घेतली जात आहे.
या पुरस्कार सोहळ्यास ज्येष्ठ पार्श्वगायिका आदरणीय उषाताई मंगेशकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा कोल्हापुरे आणि ‘पुढारी न्यूज’चे संपादक प्रसन्न जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात सांस्कृतिक जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून, संगीतप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अनोख्या सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पासेस जोशी हॉस्पिटल प्रा. लि., काक्या ब्युटीक (सिटी बाजार शेजारी, डी.एड. चौक) तसेच प्रॉमिस टेलर, अशोक भोसले (डेव्हकण) चौक येथे उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.
संगीत, सन्मान आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेला हा कार्यक्रम फलटणच्या सांस्कृतिक इतिहासात लक्षवेधी ठरणार, यात शंका नाही.

Spread the love
  • Related Posts

    साखर उद्योग संकटात; साखरेला योग्य दर मिळणे गरजेचे : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

    फलटण( आपलं फलटण वृत्तसेवा ) ऊस उत्पादकांना स्पर्धात्मक दर, कामगारांना योग्य वेतन, बोनस व अन्य सवलती तसेच तोडणी-वाहतूक ठेकेदारांना वेळेवर मोबदला मिळणे यावरच साखर कारखान्यांचे यश अवलंबून आहे. मात्र साखरेला…

    Spread the love

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    फलटण (पुढारी वृत्तसेवा ) स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि फलटण शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धुळदेव (ता. फलटण) परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून ४ किलो ६९…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    साखर उद्योग संकटात; साखरेला योग्य दर मिळणे गरजेचे : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

    साखर उद्योग संकटात; साखरेला योग्य दर मिळणे गरजेचे : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

    राष्ट्रसेवा ते समाजसेवा; कर्नल विनोद मारवाह यांना ‘व्हेटरन अचिव्हर्स अवॉर्ड’

    राष्ट्रसेवा ते समाजसेवा; कर्नल विनोद मारवाह यांना ‘व्हेटरन अचिव्हर्स अवॉर्ड’

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत
    error: Content is protected !!