खटकेवस्ती येथे आज‘विजय संकल्प मेळावा’; विकासाचा आढावा आणि भविष्यातील दिशा ठरणार

फलटण(आपलं फलटण प्रतिनिधी )आगामी निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय वातावरण तापू लागले असून, खटकेवस्ती येथेही हालचालींना वेग आला आहे. ग्रामपंचायतीचे लोकप्रिय व विकासाभिमुख सरपंच श्री. बापुराव दत्तात्रय गावडे यांच्या वतीने भव्य ‘विजय संकल्प मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शुक्रवार, दिनांक २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे. या मेळाव्यास विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे ना. निंबाळकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, माजी आमदार दिपकराव चव्हाण उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात फलटण तालुक्यातील शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या मेळाव्याच्या माध्यमातून खटकेवस्ती परिसराच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेण्यासोबतच आगामी काळातील विकास आराखड्याचा संकल्प मांडला जाणार आहे. सरपंच गावडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विविध विकासकामांची माहिती नागरिकांसमोर ठेवत पुढील वाटचालीचा रोडमॅप स्पष्ट केला जाणार असल्याचे समजते.
दरम्यान, या मेळाव्याला विविध राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते, स्थानिक पदाधिकारी, तरुण वर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा मेळावा केवळ विकास आढावा कार्यक्रम न राहता, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शक्तीप्रदर्शनाचा मंच ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“गावाच्या विकासाचा रथ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी आणि नागरिकांच्या विश्वासाला अधिक बळकटी देण्यासाठी हा विजय संकल्प मेळावा महत्त्वपूर्ण ठरेल,” असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
खटकेवस्तीतील हा मेळावा आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा ठरू शकतो, अशी चर्चा सध्या परिसरात रंगू लागली आहे.

Spread the love
  • Related Posts

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    आपलं फलटण: मुंबई वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता…

    Spread the love

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!