फलटण (आपलं फलटण) मायणी ता.खटाव येथील चांदणी चौक परिसरात आधुनिक सुविधांनी सुसज्ज ‘डॉ. कोकरे मल्टीस्पेशालिटी दातांचा दवाखाना’ लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होत असून, या दवाखान्याचे उद्घाटन रविवारी (दि. २९ मार्च) सकाळी १० वा. मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
दंतचिकित्सक डॉ. मयूर श्रीमंत कोकरे (B.D.S., MUHS नाशिक, FGD, KDC बेंगळुरू) यांच्या मार्गदर्शनाखाली हा अत्याधुनिक दवाखाना सुरू होत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना शहरातील दर्जेदार दंतसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. दिलीप बजरंग मगदूम (M.D.S., मुंबई) व मा. डॉ. सुनील बजरंग मगदूम (M.B.B.S., DNB – जनरल सर्जरी) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास परिसरातील मान्यवर, नागरिक व रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या दवाखान्यात डिजिटल एक्स-रे (RVG), अॅडव्हान्स डेंटल चेअर युनिट्स, सिंगल सिटिंगमध्ये रूट कॅनॉल, दातांवर कॅप बसविणे, सिमेंट/चांदी भरणे, दात काढणे तसेच अकलेच्या दातांची शस्त्रक्रिया, डेंटल इम्प्लांट (कृत्रिम दातरोपण), अल्ट्रासोनिक स्केलिंगद्वारे दात स्वच्छ करणे, लहान मुलांच्या दातांचे उपचार, वाकडे दात सरळ करणे, हिरड्यांचे उपचार व स्माईल डिझायनिंग यांसारख्या सर्व सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
रुग्णांच्या सोयीसाठी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सेवा उपलब्ध राहणार असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दर्जेदार व वेदनारहित उपचार देण्यावर भर दिला जाणार आहे.
या उपक्रमासाठी श्रीमंत कोकरे परिवार व मित्रपरिवाराचे विशेष सहकार्य लाभले असून, परिसरातील नागरिकांसाठी हा दवाखाना आरोग्यदायी पर्याय ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.






