शीर्षक : वधूवर परिचय मेळाव्यातून रामोशी समाज संघटनेला बळ – संजय जाधव

शीर्षक : वधूवर परिचय मेळाव्यातून रामोशी समाज संघटनाला बळ – संजय जाधव

फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) राज्यभरातील रामोशी, बेडर, बेरड समाजाच्या वधूवर व पालक परिचय मेळाव्याच्या माध्यमातून समाजात जनजागृती होण्याबरोबरच नव्याने निर्माण होणारे नातेसंबंध समाजाच्या संघटित व सामाजिक चळवळीला बळ देतील, असा विश्वास भारतीय समाज परिवर्तन संघाचे अध्यक्ष संजय नाना जाधव यांनी व्यक्त केला.
क्रांतीनायक वधूवर सुचक मंडळ व साप्ताहिक क्रांतीनायक परिवाराच्या वतीने फलटण येथील श्री संत सावतामाळी महाराज मंदिरात आयोजित राज्यस्तरीय मेळाव्यात ते अध्यक्षीय भाषण करत होते. या कार्यक्रमाला जेजुरी देवस्थानचे माजी अध्यक्ष पोपटराव खोमणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी विचारपीठावर जेष्ठ विचारवंत सि. म. जाधव, सुधीर नाईक, डॉ. लिला मदने, प्रा. डॉ. भरत बोडरे, प्रा. डॉ. अनिरुद्ध मंडले, डॉ. भारत भाडलकर, प्रा. आनंदराव जाधव, फलटण नगरपालिकेच्या नगरसेविका कविता मदने, जेजुरीचे नगरसेवक रोहित खोमणे, माळेगावचे नगरसेवक किरण खोमणे आदी मान्यवर उपस्थित होते.
संजय जाधव पुढे म्हणाले की, रामोशी समाजातील युवकांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन स्वतःसह समाजाची प्रगती साधावी. सामाजिक, शैक्षणिक व राजकीय चळवळीत मागे राहिलेल्या समाजबांधवांनी एकत्र येऊन संघटित लढा उभारणे गरजेचे आहे. नातेसंबंधातून सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी अशा वधूवर परिचय मेळाव्यांची आजच्या काळात अत्यंत गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जेष्ठ विचारवंत सि. म. जाधव यांनी रामोशी समाजाच्या लढाऊ परंपरेचा उल्लेख करत आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या आदर्शावर चालत समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. साप्ताहिक क्रांतीनायक परिवाराचे शत्रुघ्न जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचे कार्य आदर्शवत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शत्रुघ्न जाधव यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. राज्यभरातील वधूवर व पालकांनी या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी नगरसेविका कविता मदने, रोहित खोमणे व किरण खोमणे यांचा स्वागताध्यक्ष बाळासाहेब मदने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास ऋषिकेश माकर, खडेराव मदने, लक्ष्मीनराव जाधव, माऊली खोमणे, सागर जाधव, शिवाजीराव जाधव, डॉ. सुभाष गुळवे, सुनील मदने, हणमंतराव जाधव, सुनील जाधव, भरत जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन पी. जी. मदने, राजेंद्र खोमणे, भारती मदने, हणमंत मसुगडे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप जाधव यांनी तर आभार आनंदराव जाधव यांनी मानले.

आपलं फलटण न्यूज

महत्वपूर्ण बातम्यांसाठी खालील लिंक द्वारे आपलं फलटण व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/DknHjOSvumpBHG66gLBOQL?mode=gi_t

Spread the love
  • Related Posts

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी: शिक्षण क्षेत्रात गेली दोन दशके उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या वडले, फलटण येथील सौ. संजीवनी संपत सोनवलकर यांना ग्लोबल इलाइट मीडिया टेक, पुणे…

    Spread the love

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण-पंढरपूर महामार्गावरील राजुरी चौफुला कुरवली पाटी ता. फलटण येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला आय-ट्वेंटी कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मंगल विठ्ठल साठे (वय 42…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा
    error: Content is protected !!