नाईकबोमवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

नाईकबोमवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

फलटण (आपलं फलटण) तालुक्यातील नाईकबोंमवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. हा धार्मिक सोहळा ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या सोहळ्याची सुरुवात गुरुवार, दि. २६ मार्च रोजी होणार असून सांगता बुधवार, दि. २ एप्रिल रोजी होणार आहे. सप्ताहात दररोज काकडा आरती, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन व कीर्तन यांसारखे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सोहळ्यात विविध कीर्तनकार व प्रवचनकारांची उपस्थिती लाभणार आहे. ह.भ.प. रवीकुमार महाराज ठोंबरे पाटील,ह.भ.प. नवनाथ महाराज कोलवडकर, ह.भ.प. ओंकार महाराज डांगे, ह.भ.प. प्रेम महाराज सूळ, ह.भ.प. राजेंद्र महाराज मोरे, ह.भ.प. रामदास महाराज कदम आणि ह.भ.प. अशोक महाराज शिंदे आदींची कीर्तने होणार आहेत.
या सप्ताहात कलश पूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असून, विविध भजनी मंडळेही आपली सेवा सादर करणार आहेत. तसेच सप्ताहाच्या दरम्यान रोज काकड आरती, प्रवचन कीर्तन ,श्री ज्ञानेश्वरी वाचन,भजन,जागर इत्यादी धार्मिक कार्यक्रम राहणार आहे.
दि. १ एप्रिल रोजी सायंकाळी ‘श्री’ची भव्य दिंडी प्रदक्षिणा काढण्यात येणार असून, सप्ताहाची सांगता महाप्रसादाने होणार आहे.
हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी समस्त नाईकबोंमवाडी ग्रामस्थ परिश्रम घेत असून, पंचक्रोशीतील भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Spread the love
  • Related Posts

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    फलटण (पुढारी वृत्तसेवा ) स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि फलटण शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धुळदेव (ता. फलटण) परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून ४ किलो ६९…

    Spread the love

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    फलटण (आपलं फलटण )‘फलटण एज्युकेशन सोसायटी’ संचलित स्वायत्त आणि ‘NAAC A’ दर्जा तसेच ‘NBA’ मान्यता प्राप्त ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण’च्या वतीने ३ जून रोजी भव्य ‘मिनी मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    राष्ट्रसेवा ते समाजसेवा; कर्नल विनोद मारवाह यांना ‘व्हेटरन अचिव्हर्स अवॉर्ड’

    राष्ट्रसेवा ते समाजसेवा; कर्नल विनोद मारवाह यांना ‘व्हेटरन अचिव्हर्स अवॉर्ड’

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!
    error: Content is protected !!