अनुरूप जोडीदाराच्या शोधासाठी २९ मार्चला पुण्यात हिंदू-शेगर वधू-वर परिचय मेळावा

अनुरूप जोडीदाराच्या शोधासाठी २९ मार्चला पुण्यात हिंदू-शेगर वधू-वर परिचय मेळावा

फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) हिंदू-शेगर समाजातील वधू-वरांसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याच्या उद्देशाने पुणेकर नातीगोती परिवार यांच्या वतीने हिंदू-शेगर वधू-वर परिचय मेळावा २०२६ आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पर्वती पायथा परिसरातील राजीव गांधी अकादमी हॉल (पंचमी हॉटेलजवळ, ७ वंडर पार्क शेजारी) येथे होणार आहे. मेळाव्याचे हे अकरावे वर्ष आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या मेळाव्यास समाजातील इच्छुक वधू-वर व त्यांच्या कुटुंबीयांचा मोठा प्रतिसाद अपेक्षित आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वधू वा वर यांचे सोबत येणाऱ्या व्यक्तीसाठी नोंदणी शुल्क २०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. या शुल्कामध्ये नोंदणीकृत उमेदवारांची माहितीपत्रके, पोस्टेज खर्च तसेच अल्पोपहाराचा समावेश करण्यात आला आहे.
नोंदणीसाठी आयोजकांनी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली असून इच्छुकांनी दिलेल्या लिंकवर आपली माहिती भरून नोंदणी करावी. तसेच नोंदणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून त्याची माहिती संबंधित आयोजकांना व्हॉट्सअ‍ॅपवर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा परिचय मेळावा केवळ हिंदू-शेगर समाजातील इच्छुक मुला-मुलींसाठी असून, पुण्यात स्थायिक असण्याची अट नाही. मात्र, कार्यक्रमात प्रवेशासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
अधिक माहितीसाठी डॉ. सोपान इवरे, जयवंत खोमणे, अरुण इरकर, नवनाथ भुरे, आकाश पोंदकुले, अनिल आटोळे आदींशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अनुरूप जोडीदाराच्या शोधासाठी २९ मार्चला पुण्यात हिंदू-शेगर वधू-वर परिचय मेळावा
सहभाग नोंदणी लिंक https://forms.gle/rsLCVdTMbK1xvHY26

आपलं फलटण न्यूज

महत्वपूर्ण बातम्यांसाठी खालील लिंक द्वारे आपलं फलटण व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/DknHjOSvumpBHG66gLBOQL?mode=gi_t

Spread the love
  • Related Posts

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    आपलं फलटण प्रतिनिधीसातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक, साहित्यप्रेमी व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व कै. प्रा. रमेश तुकाराम आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.००…

    Spread the love

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    आपलं फलटण प्रतिनिधी भारतीय शेती एका नव्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभी आहे. वाढते उत्पादन, बदलते हवामान, रासायनिक अवशेषांबाबत वाढती जागरूकता आणि निर्यातीसाठी अधिक कठोर होत जाणारे कमाल अवशेष मर्यादा (एम.आर.एल.) निकष…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    फलटणच्या विकासाला ७० कोटींची सुवर्णभरारी; अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचेरणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून तातडीची मंजुरी

    फलटणच्या विकासाला ७० कोटींची सुवर्णभरारी; अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचेरणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून तातडीची मंजुरी

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

    पालखीसाठी फलटण तालुक्यात आरोग्य विभाग सज्ज भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व्यापक नियोजन; सभापती शिवांजली भोसले यांची माहिती

    पालखीसाठी फलटण तालुक्यात आरोग्य विभाग सज्ज     भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व्यापक नियोजन; सभापती शिवांजली भोसले यांची माहिती

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : फलटण शहरात विशेष वाहतूक आराखडा जाहीर१७ व १८ जुलै रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे शहर पोलिसांचे आवाहन

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : फलटण शहरात विशेष वाहतूक आराखडा जाहीर१७ व १८ जुलै रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे शहर पोलिसांचे आवाहन
    error: Content is protected !!