फलटण येथे २२ मार्चला राज्यस्तरीय बेडर-रामोशी समाज वधू-वर पालक परिचय मेळावा

फलटण येथे २२ मार्चला राज्यस्तरीय बेडर-रामोशी समाज वधू-वर पालक परिचय मेळावा
फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) क्रांतीनायक वधूवर सूचक मंडळ व साप्ताहिक क्रांतीनायक परिवाराच्या वतीने राज्यस्तरीय बेडर-रामोशी (बेरड) समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा रविवार, दि. २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्री संत सावतामाळी महाराज मंदिर, नाना पाटील चौक, फलटण येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याची माहिती संयोजक शत्रुघ्न जाधव यांनी दिली.
मेळाव्याचे उद्घाटन जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे तसेच अखिल भारतीय बेरड-बेडर रामोशी कृती समितीचे अध्यक्ष मोहन मदने यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख (खेड) रामदास धनवटे, राष्ट्रीय परिवर्तन महासंघाचे अध्यक्ष संजय जाधव, आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक रामवंशी संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण, उमाजी नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी काका खोमणे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव मदने, जेजुरी देवस्थानचे माजी अध्यक्ष पोपटराव खोमणे, जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अंकुश जाधव, सर उमाजी नाईक क्रांती संघटनेचे अध्यक्ष लखन चव्हाण, खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती लहू कुमार मदने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी आनंदराव जाधव, प्रल्हाद पाटोळे, विलासराव आडके, दीपक मदने, अंकुश चव्हाण, मेजर शामराव मदने यांच्यासह महाराष्ट्रातील रामोशी समाज चळवळीत कार्यरत विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्यास रामोशी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष बाळासाहेब मदने यांनी केले आहे.

Spread the love
  • Related Posts

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी: शिक्षण क्षेत्रात गेली दोन दशके उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या वडले, फलटण येथील सौ. संजीवनी संपत सोनवलकर यांना ग्लोबल इलाइट मीडिया टेक, पुणे…

    Spread the love

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण-पंढरपूर महामार्गावरील राजुरी चौफुला कुरवली पाटी ता. फलटण येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला आय-ट्वेंटी कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मंगल विठ्ठल साठे (वय 42…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा
    error: Content is protected !!