फलटण तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींवर प्रशासकराजनिवडणूक होईपर्यंत विद्यमान सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती

फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा)
फेब्रुवारी २०२६ अखेर मुदत संपलेल्या व प्रशासकीय अडचणींमुळे निवडणुका घेणे शक्य नसलेल्या फलटण तालुक्यातील तब्बल ६८ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज लागू करण्यात आला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आश्विनी नागराज यांनी नुकत्याच काढलेल्या विशेष आदेशाद्वारे संबंधित ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत किंवा पुढील सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
नवनियुक्त प्रशासकांनी कायद्याच्या अधीन राहून व प्रशासकीय समितीच्या सल्ला व मान्यतेने ग्रामपंचायतीचे कामकाज करावे, असे स्पष्ट निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आश्विनी नागराज यांनी दिले आहेत.
▪️ प्रशासक म्हणून सरपंचांची नियुक्ती
साखरवाडी (पिंपळवाडी) – अपर्णा दत्तात्रय बोडरे, तांबवे – नीलम विशाल गायकवाड, कोळकी – अपर्णा विक्रम पखाले, पिराचीवाडी – दीपक भगवान सावंत, खुंटे – हनुमंत निवृत्ती भिसे, भिलकटी – प्रकाश रामचंद्र गोडसे, जाधववाडी (फ) – सीमा आबाजी गायकवाड, अलगुडेवाडी – मंगल संभाजी शिंदे, सोनवडी (खुर्द) – शालन लालासो सूर्यवंशी, तिरकवाडी – अर्चना गंगाराम बनकर, सस्तेवाडी – रेवती गणेश सपताळे, कापडगाव – लता नंदकुमार करे, निरगुडी – कोमल सचिन सस्ते, रावडी बुद्रुक – रसिका अजित घाडगे, वाघोशी – ताराचंद उत्तम पवार, जिंती – मंगल जालिंदर माने, कापसी – गौरी नितीन जाधव, काशीदवाडी – गौरी अमर गोरे, फरांदवाडी – रूपाली अश्विन कर्णे, कुरवली (बुद्रुक) – राणी अनंतकुमार सुळ, शिंदेनगर – रूपाली सुनील शिंदे, ठाकूरकी – भानुदास अंतोबा घनवट, नांदल – वृषाली नितीन कोळेकर, सरडे – मंदा सोमनाथ करडे, सांगवी – संतोष मोरे, राजुरी – मनोहर ज्ञानदेव पवार, जावली – सुरेखा ज्ञानेश्वर बुधावले, खामगाव – अर्चना नितीन जगताप, हिंगणगाव – दीपिका संदीप भोईटे, मुंजवडी – उषा मालोजी येडे, साठे – नीलम मिलन खांडेकर, खराडेवाडी – कुसुम गणपत खराडे, मलवडी – बाजीराव बबन तरडे, तडवळे – प्रशांत चंद्रकांत खराडे, विंचुर्णी – राणी बापू चव्हाण, वडगाव – सारिका सुरेश जगताप, निंबळक – सीमा शिवाजी बनकर, मिरढे – रूपाली सतीश मदने, कोरेगाव – उज्वला सुनील शिंदे, मुरूम – प्रियांका योगेश बोंद्रे, भाडळी बुद्रुक – वसंतराव सर्जेराव मुळीक, भाडळी खुर्द – मोनिका रवींद्र पिसाळ, टाकळवाडे – आशाताई बापूराव सांगळे, ढवळ – अंकुश ज्ञानदेव लोखंडे, आंधरुड – संध्या सचिन राऊत, रावडी (खुर्द) – भगवान दादासो होळकर, आरडगाव – रूपाली अंकुश जाधव, शिंदेवाडी – आनंदराव भगवान यादव, नाईकबोंमवाडी – जया पोपट पवार, कांबळेश्वर – भारती शिवाजी भिसे, निंभोरे – मोहिनी दीपक चिंचकर, काळज – संजय दादा गाढवे, बिबी – रूपाली महिपती बोबडे, हणमंतवाडी – आरती शरद पवार, बोडकेवाडी – आशा महादेव ठोंबरे, होळ – नजमा दिलावर मेटकरी, सोनगाव – रंजना धनाजी कांबळे, वडजल – स्वाती अमोल पिसाळ, फडतरवाडी – पौर्णिमा प्रेमजीत काटे, आळजापूर – पुष्पा चंद्रकांत पवार, राजाळे – मोनाली हर्षल निंबाळकर, गुणवरे – शिवाजी मारुती गावडे, सोनवडी बुद्रुक – सुनीता रामचंद्र मोरे, ढवळेवाडी (नि) – दत्तू मुकुटराव माने, झिरपवाडी – वर्षा नितीन बोरकर, पवारवाडी – जयश्री दत्तात्रय गावडे, शेरेचेवाडी (हिं) – रंजना गणपत कणसे, जाधववाडी (ता) – शारदा दयाराम ठोंगील.
▪️ प्रशासकराज का लागू?
फलटण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी २०२६ अखेर संपली. मात्र प्रशासकीय अडचणींमुळे तत्काळ निवडणुका घेणे शक्य नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात प्रशासकराज लागू करण्यात आला आहे.
▪️ किती काळ राहणार प्रशासक?
जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार निवडणुका होईपर्यंत किंवा पुढील सहा महिन्यांपर्यंत प्रशासक पदाची व्यवस्था लागू राहणार आहे.
*समितीच्या सल्ल्यानेच निर्णय
प्रशासक म्हणून नियुक्त केलेल्या सरपंचांनी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रशासकीय समितीच्या सल्ला व मान्यतेनेच सर्व निर्णय घ्यावेत, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आश्विनी नागराज यांनी दिले आहेत.

Spread the love
  • Related Posts

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    आपलं फलटण: मुंबई वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता…

    Spread the love

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!