पुस्तकी ज्ञानाचे आकलन करून मराठी संस्कृतीचे जतन करा : सौ. अश्विनी वैद्य

फलटण : विद्यार्थी दशेत असताना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता, विविध स्पर्धांमधून केलेल्या लेखनाचे सखोल आकलन करून ते दैनंदिन जीवनात आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सौ. अश्विनी वैद्य यांनी केले. मातृभाषेवर नितांत प्रेम असणे गरजेचे असून, दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.महात्मा एज्युकेशन सोसायटी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा गौरव दिन’ या कार्यक्रमात इंग्लंडस्थित ‘महाराष्ट्र मराठी मंडळ’च्या सदस्या सौ. अश्विनी वैद्य प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
इंग्लंडमध्ये स्थायिक असतानाही मराठी भाषा व संस्कृतीचे जतन करण्यासाठी तेथील मराठी कुटुंबे ‘महाराष्ट्र मराठी मंडळा’च्या माध्यमातून एकत्र येतात. पुस्तक वाचन, कविता वाचन, कथा सादरीकरण अशा विविध उपक्रमांद्वारे मराठीचे संवर्धन केले जाते, अशी माहिती त्यांनी दिली. स्पर्धेच्या युगात इंग्रजीवर प्रभुत्व आवश्यक असले, तरी मराठीशी असलेली नाळ तुटू देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. अवांतर वाचनाची सवय विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालते आणि मराठीचे महत्त्व प्रभावीपणे पटवून देण्यास मदत करते, असे सांगत त्यांनी आपली ‘शब्द’ ही स्वरचित कविता सादर केली.
प्रा. अनंत डोईफोडे यांनी मराठी भाषेच्या प्रवासावर प्रकाश टाकला. संत परंपरेतून मराठीची समृद्धी घडली असून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या ओव्या-अभंगांतून मराठीची गोडी आणि वैभव दिसून येते, असे त्यांनी सांगितले. संस्कृत ही जननी मानली जात असली, तरी प्राकृतच्या संस्कारातून आधुनिक मराठीची निर्मिती झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. माध्यमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे आणि मराठी शाळा टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.
संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे यांनी अध्यक्षीय भाषणात या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. इंग्रजीचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डोईफोडे आणि सातासमुद्रापार मराठीचे संवर्धन करणाऱ्या त्यांच्या कन्या सौ. वैद्य यांची एकाच व्यासपीठावर उपस्थिती हा ‘दुग्धशर्करा योग’ असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठी भाषा ही केवळ शासकीय सोहळ्यांनी नव्हे, तर जात्यावरच्या ओव्या, शेतातील भलरी गीते आणि संतांच्या अभंगांनी समृद्ध झाली आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक मनीष निंबाळकर व भिवा जगताप यांनी मान्यवरांचे स्वागत केले. विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन उपशिक्षक किशोर पवार यांनी केले, तर कार्यवाह व लेखक अमर शेंडे यांनी आभार प्रदर्शन केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेबद्दल अभिमान आणि जाणीव निर्माण झाली.

Spread the love
  • Related Posts

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    आपलं फलटण: मुंबई वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता…

    Spread the love

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!