फलटण नगरपरिषदेत आज ४६ विषयांवर चर्चा; नामांतराचा मुद्दा ठरणार केंद्रस्थानी

फलटण नगरपरिषदेत आज ४६ विषयांवर चर्चा; नामांतराचा मुद्दा ठरणार केंद्रस्थानी
फलटण ( फलटण आपलं फलटण )फलटण नगरपरिषदेची आज (दि. २५ मार्च) होणारी सर्वसाधारण सभा शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात असून, तब्बल ४६ विषयांवर चर्चा होणार आहे. मात्र, या सर्व विषयांमध्ये विषय क्रमांक ९ अंतर्गत मांडण्यात आलेला नामांतराचा प्रस्ताव सर्वाधिक गाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याचे संकेत मिळत आहेत.
नगरपरिषदेच्या मालकीच्या इमारती, सभागृहे, शॉपिंग सेंटर आणि काही भागांना दिलेली नावे बदलून त्या ठिकाणी थोर महापुरुषांची नावे देण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी विषय पत्रिकेतून पुढे आणला आहे. शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी आणि महापुरुषांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी विरोधकांनी यास ठाम विरोध दर्शविला आहे.
विरोधकांच्या मते, शहराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक वर्षांपासून प्रचलित असलेली नावे बदलणे योग्य नसून, नवीन विकसित होणाऱ्या भागांना महापुरुषांची नावे देण्याचा पर्याय स्वीकारावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. विशेषतः काही वास्तूंशी संबंधित ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेता नामांतर टाळावे, अशी मागणी पत्राद्वारे नगराध्यक्षांकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, शहराच्या विकासाशी संबंधित इतर महत्त्वाचे विषयही सभेत चर्चेला येणार असले, तरी त्यावर मोठा वाद न होता ते मंजूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, नामांतराच्या मुद्द्यावरून वातावरण तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. सत्ताधाऱ्यांचा महापुरुषांच्या नावांचा आग्रह आणि विरोधकांचा ऐतिहासिक नावे जपण्याचा मुद्दा यामुळे सभागृहात जोरदार चर्चा रंगण्याची शक्यता आहे.
सभेपूर्वीच शहरभर या विषयावर उलटसुलट चर्चा सुरू असून, विविध स्तरांतून मतप्रवाह व्यक्त होत आहेत. त्यामुळे आजच्या सभेत प्रशासन कोणती भूमिका घेते आणि नामांतराचा प्रस्ताव मंजूर होतो की स्थगित ठेवला जातो, याकडे संपूर्ण फलटणकरांचे लक्ष लागले आहे.

Spread the love
  • Related Posts

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

     आपलं फलटण प्रतिनिधी “स्थानिक विरोधकांच्या सांगण्यावरून श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा षडयंत्राला बळी पडू नये. सभासदांच्या बळावर आणि लोकांच्या विश्वासाच्या जोरावर श्रीराम सहकारी साखर…

    Spread the love

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा
    error: Content is protected !!