मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

 आपलं फलटण प्रतिनिधी

     श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, नगरसेवक अनिकेतराजे नाईक-निंबाळकर, संचालक मंडळातील पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

    आ.रामराजे पुढे म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानंतर झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सभासदांनी बहुमताने श्री दत्त इंडिया साखर कारखान्यासोबत भागीदारी तत्त्वावर कारखाना चालविण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींमुळे हा प्रस्ताव रखडला असून, येणाऱ्या गळीत हंगामावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.

      यावेळी त्यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधत, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चुकीची माहिती पोहोचवून जवाहर समूहावर दबाव आणून करार मोडण्याचा  आणि श्रीराम कारखाना बंद पाडण्याचा डाव आखला जात आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी व स्वतःच्या कारखान्याला फायदा व्हावा यासाठी श्रीराम  कारखान्याचे भवितव्य पणाला लावण्याचा हा प्रयत्न सभासद कदापि यशस्वी होऊ देणार नाहीत,” असे स्पष्ट केले.

यापूर्वी सभासद मेळाव्यात केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, सभासदांनी मोठ्या प्रमाणावर शेअर्सची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली असून अवघ्या काही दिवसांत सुमारे एक कोटी रुपयांचे भागभांडवल उभे राहिले आहे. कारखाना कार्यालयात दररोज सभासदांची गर्दी होत असून हा प्रतिसाद श्रीरामबाबत सभासदांच्या असलेल्या विश्वासाचे द्योतक आहे.

दरम्यान, भागीदारीचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित असला तरी सभासदांचा वाढता प्रतिसाद आणि भागभांडवल उभारणीचा वेग पाहता ‘आपला कारखाना आपणच उभा करायचा’ हा निर्धार अधिक बळकट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सभासदांच्या एकजुटीच्या बळावर श्रीराम सहकारी साखर कारखाना पुन्हा कार्यान्वित करण्याचा विश्वास रामराजे नाईक-निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला. 

    कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी सहकार मंत्री, सहकार आयुक्त व वरिष्ठ पातळीवर मंत्री स्तरावर सर्वच ठिकाणी कारखान्याच्या बाबतीत सकारात्मकता आहे. शासनाने  एकाच वेळी तीन कारखान्यांच्या बाबत निर्णय घेण्यासाठी मंत्री स्तरावर बैठक घेतली त्यामध्ये  अन्य दोन कारखान्यांना तत्परतेने आदेश देण्यात आले मात्र श्रीराम कारखान्याच्या बाबतीत निर्णय प्रक्रिया जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली जात आहे कारखाना सुरू करण्यात खरंतर कोणतीच अडचण नाही पण जाणीवपूर्वक निर्णय न देण्याने हा प्रश्न लोंबकळत  ठेवला आहे. यासाठी  स्थानिक विरोधकांचा पत्रव्यवहार कारणीभूत असल्याचा सणसणाटी  आरोप शेंडे यांनी केला

Spread the love
  • Related Posts

    सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक : फलटण केंद्रावर १०० टक्के मतदान; प्रक्रिया शांततेत संपन्न

    आपलं फलटण ( वृत्तसेवा )सातारा-सांगली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी फलटण येथील मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया गुरुवारी शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. केंद्रावर नोंद असलेल्या सर्व ३१ मतदारांनी…

    Spread the love

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटण( आपलं फलटण ) फलटण तालुक्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आगामी काही दिवसांत फलटणमध्ये अतिरिक्त MIDC उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!