सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक : फलटण केंद्रावर १०० टक्के मतदान; प्रक्रिया शांततेत संपन्न

आपलं फलटण ( वृत्तसेवा )
सातारा-सांगली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी फलटण येथील मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया गुरुवारी शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. केंद्रावर नोंद असलेल्या सर्व ३१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने येथे शंभर टक्के मतदानाची नोंद झाली.
फलटण तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी ८ वाजता मतदानास प्रारंभ झाला. निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रशासनाने आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शिवसेनेचे १० नगरसेवक मतदार अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या समवेत मतदान केंद्रावर दाखल झाले. त्यांनी नियमानुसार मतदानाचा हक्क बजावला.
त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २१ मतदार नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या समवेत मतदान केंद्रावर आले. त्यांनीही मतदान प्रक्रियेत सहभागी होत आपले मतदान नोंदविले.
फलटण मतदान केंद्रावर एकूण ३१ मतदारांची नोंद होती. विशेष म्हणजे सर्वच मतदारांनी मतदान केल्याने केंद्रावर शंभर टक्के मतदानाची नोंद झाली. संपूर्ण मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत, कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडली.
मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
फलटण केंद्रावरील मतदान प्रक्रिया प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केंद्रावर १०० टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती दिली.

Spread the love
  • Related Posts

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

     आपलं फलटण प्रतिनिधी “स्थानिक विरोधकांच्या सांगण्यावरून श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा षडयंत्राला बळी पडू नये. सभासदांच्या बळावर आणि लोकांच्या विश्वासाच्या जोरावर श्रीराम सहकारी साखर…

    Spread the love

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटण( आपलं फलटण ) फलटण तालुक्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आगामी काही दिवसांत फलटणमध्ये अतिरिक्त MIDC उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!