मायणी (आपलं फलटण प्रतिनिधी) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवड येथील जयभवानी विद्यालयाची विद्यार्थिनी आदिती मोहन दगडे हिने भटक्या जमाती (क) प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
आदितीला एस. जे. लिंगे, डी. पी. घाडगे, पी. डी. घाडगे, ए. पी. पळे, ए. व्ही. साखरे, एस. एस. रोकडे आणि जी. व्ही. कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
एन.एम.एम.एस. शिष्यवृत्तीअंतर्गत आदितीला बारावीपर्यंत दरवर्षी 12 हजार रुपये चार वर्षांसाठी 48 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
आदितीचे माजी आ. डॉ. दिलीपराव येळगावकर, जि.प सदस्य सूरज पाटील, संस्थेचे चेअरमन रघुनाथ घाडगे, सचिव तुषार घाडगे, मुख्याध्यापक शेलार सर, न्यूरोसर्जन डॉ. अमोल सुडके, यशोदीप सोसायटीचे चेअरमन मोहन दगडे, विठोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रघुनाथ कचरे, राजू कचरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थांनी अभिनंदन केले






