विडणी-बरड-वडले ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत नवे चेहरे; भाजप-शिवसेना आमने-सामने

फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा) : फलटण तालुक्यातील विडणी, बरड व वडले या ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी २८ एप्रिल रोजी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी बुधवार (दि. २९) रोजी सकाळी ११ वाजता पूर्ण झाली. या निवडणुकीतील विजयी उमेदवारांची माहिती तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी अधिकृतरीत्या जाहीर केली.

तालुक्यातील एकूण नऊ जागांसाठी ही पोटनिवडणूक झाली. त्यापैकी विडणी ग्रामपंचायतीत सर्वाधिक सात जागांसाठी निवडणूक पार पडली, तर बरड व वडले येथे प्रत्येकी एक जागेसाठी मतदान झाले.

विडणी ग्रामपंचायत निकाल

विडणी ग्रामपंचायतीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्याचे चित्र दिसून आले. येथील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –

भरत रघुनाथ कोकरे, दत्तात्रय भिवा अब्दागिरे, कोल्हे वैशाली शरद, कैलास कोंडीबा जगताप, सुष्मिता सागर कांबळे, सचिन नाथा जगताप आणि शांताबाई विष्णू गाडे हे उमेदवार विजयी झाले.

एकूण सात जागांपैकी चार जागांवर भाजपचे, तर तीन जागांवर शिवसेना (राजे गट) समर्थित उमेदवारांनी विजय मिळवला.

बरड ग्रामपंचायत

बरड ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत उषा पोपट खटके यांनी विजय मिळवून शिवसेना (राजे गट)चे वर्चस्व कायम राखले.

वडले ग्रामपंचायत

वडले येथे रणजीत मल्हारी सोनवलकर यांनी विजय मिळवला. येथेही शिवसेना (राजे गट)ने आपली ताकद सिद्ध केली.

एकूण राजकीय चित्र

या सर्व जागांवर यापूर्वी शिवसेना (राजे गट)चे वर्चस्व होते. मात्र या पोटनिवडणुकीत भाजपने काही जागांवर यश मिळवत आव्हान निर्माण केले. निवडून आलेल्या सदस्यांपैकी चार सदस्य भाजपचे, तर पाच सदस्य शिवसेना (राजे गट)चे आहेत.

     एकूणच, या पोटनिवडणुकीत विडणीत स्थानिक राजकीय समीकरण बदललले असून येथे भाजपला पूर्ण बहुमत मिळाले आहे . बरड वडले येथे राजकीय समीकरणात फरक पडला नाही . या निवडणुकीत भाजप-शिवसेना यांच्यातील स्पर्धा स्पष्टपणे दिसून आली. या पोट निवडणुकीच्या माध्यमातून भविष्यात येऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका भाजप शिवसेनेमध्ये संघर्षमय तुल्यबळ होतील असे चित्र उभे राहिले आहे

Spread the love
  • Related Posts

    लोकनेते स्व. विनायकराव श्यामराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आंदरुड येथे भव्य रक्तदान शिबिर; समाजोपयोगी उपक्रमांची मेजवानी

    आपलं फलटण: आंदरूड प्रतिनिधीलोकनेते स्व. विनायकराव श्यामराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे चिरंजीव तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराज विनायक पाटील यांच्या पुढाकारातून सोमवार, दि. 20 जुलै 2026 रोजी…

    Spread the love

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    आपलं फलटण प्रतिनिधीसातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक, साहित्यप्रेमी व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व कै. प्रा. रमेश तुकाराम आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.००…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    लोकनेते स्व. विनायकराव श्यामराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आंदरुड येथे भव्य रक्तदान शिबिर; समाजोपयोगी उपक्रमांची मेजवानी

    लोकनेते स्व. विनायकराव श्यामराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आंदरुड येथे भव्य रक्तदान शिबिर; समाजोपयोगी उपक्रमांची मेजवानी

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    फलटणच्या विकासाला ७० कोटींची सुवर्णभरारी; अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचेरणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून तातडीची मंजुरी

    फलटणच्या विकासाला ७० कोटींची सुवर्णभरारी; अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचेरणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून तातडीची मंजुरी

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

    पालखीसाठी फलटण तालुक्यात आरोग्य विभाग सज्ज भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व्यापक नियोजन; सभापती शिवांजली भोसले यांची माहिती

    पालखीसाठी फलटण तालुक्यात आरोग्य विभाग सज्ज     भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व्यापक नियोजन; सभापती शिवांजली भोसले यांची माहिती
    error: Content is protected !!