फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) – सामाजिक बांधिलकी जपत फलटण तालुक्यातील आदर्की खुर्द येथे मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कमिंस इंडिया लिमिटेड, बास्को ग्रामीण विकास केंद् व ग्रामपंचायत आदर्की खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर राबविण्यात येणार आहे.या शिबिरामध्ये नागरिकांना डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात येणार असून, अल्प दरात चष्म्यांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, मोतीबिंदूचे ऑपरेशन पूर्णपणे मोफत करण्यात येणार असून, ही शस्त्रक्रिया शिरवळ येथील कमला मेहता हॉस्पिटल येथे केली जाणार आहे.हे
हे शिबिर बुधवार, दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत आदर्की खुर्द येथील निष्णाई माता मंदिर परिसरात आयोजित करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेत आपल्या डोळ्यांची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी आबासो काटकर (8668733043) आणि चंद्रकांत बोबडे (9730591688) यांच्याशी संपर्क साधावा.






