सलग तिसऱ्यांदा राजेश हेंद्रे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड

फलटण ( आपलं फलटण ) येथील श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी राजेश हरिभाऊ हेंद्रे यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. विठ्ठल मंदिरात पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्षपदी मिलिंद हरिदास गाटे, सचिवपदी राजेंद्र रामदास कुमठेकर यांची निवड करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून डॉ. राजेंद्र विठ्ठल हेंद्रे, राजेंद्र दत्तात्रय गाटे, देवेंद्र माधव हेंद्रे, श्रीकृष्ण केशव कुमठेकर, कौस्तुभ श्रीपाद टाळकुटे, मृणाल किरण पोरे आणि मंगेश राजेंद्र पोरे यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर समाजातील बंधू-भगिनींकडून सर्व पदाधिकाऱ्यांचे उत्स्फूर्त अभिनंदन करण्यात आले. यावेळी फलटण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. मोहिनी मंगेश हेंद्रे उपस्थित होत्या. त्यांचा श्री संत शिरोमणी नामदेव महाराज विठ्ठल मंदिर महिला मंडळाच्या अध्यक्षा सुलभाताई मोहोटकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष राजेश हेंद्रे यांनी वर्षभरात ट्रस्टमार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा सादर करत आगामी काळात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. सभेला समाजातील मोठ्या संख्येने बांधव-भगिनी उपस्थित होते.
फोटो ओळ : फलटण : श्री संत नामदेव महाराज शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वार्षिक अहवाल प्रकाशनावेळी अध्यक्ष राजेश हेंद्रे व मान्यवर समाज बांधव.

Spread the love
  • Related Posts

    माळेगाव कारखान्याचा पहिला ऊस हप्ता इतर कारखान्यांपेक्षा अधिक देणार,फलटण तालुक्यातील गेटकेन ऊस उत्पादकांनाही चांगला दर; पहिल्या दिवसापासून ऊसतोडीचे नियोजन

    आपलं फलटण (समाधान कळसकर) : फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांप्रमाणेच ऊसदर देण्यात येईल. तसेच आगामी गळीत हंगामातील ऊसाचा पहिला हप्ता इतर कारखान्यांपेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न…

    Spread the love

    “आमचा धनगराचा पोरगा आहे म्हणून न्याय मिळणार नाही का?” डॉ. रुपनवरांचे पार्थिव चार तास रुग्णालयाच्या आवारात; लेखी आश्वासनानंतर अंत्यविधीसाठी फडतरीकडे रवाना — नातेवाईकांचा संतप्त सवाल, व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह

    फलटण: (पोपट मिंड) फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या आत्महत्येने केवळ एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला नसून, आरोग्य व्यवस्थेतील संवेदनशीलता, तक्रारींचे गांभीर्य आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीबाबतही गंभीर…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    माळेगाव कारखान्याचा पहिला ऊस हप्ता इतर कारखान्यांपेक्षा अधिक देणार,फलटण तालुक्यातील गेटकेन ऊस उत्पादकांनाही चांगला दर; पहिल्या दिवसापासून ऊसतोडीचे नियोजन

    माळेगाव कारखान्याचा पहिला ऊस हप्ता इतर कारखान्यांपेक्षा अधिक देणार,फलटण तालुक्यातील गेटकेन ऊस उत्पादकांनाही चांगला दर; पहिल्या दिवसापासून ऊसतोडीचे नियोजन

    “आमचा धनगराचा पोरगा आहे म्हणून न्याय मिळणार नाही का?” डॉ. रुपनवरांचे पार्थिव चार तास रुग्णालयाच्या आवारात; लेखी आश्वासनानंतर अंत्यविधीसाठी फडतरीकडे रवाना — नातेवाईकांचा संतप्त सवाल, व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह

    “आमचा धनगराचा पोरगा आहे म्हणून न्याय मिळणार नाही का?”                                 डॉ. रुपनवरांचे पार्थिव चार तास रुग्णालयाच्या आवारात;       लेखी आश्वासनानंतर अंत्यविधीसाठी फडतरीकडे रवाना — नातेवाईकांचा संतप्त सवाल, व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात
    error: Content is protected !!