आमदारांच्या बंगल्यासमोरच बनावट पोलिसांची करामत; वृद्धेकडून सव्वा लाखांचे दागिने लंपास

फलटण (आपलं फलटण ): शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली. पोलीस असल्याचे भासवून दोन भामट्यांनी एका ७१ वर्षीय वृद्ध महिलेची हातचलाखीने फसवणूक करत सुमारे एक लाख वीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. विशेष म्हणजे हा प्रकार थेट आमदार सचिन पाटील यांच्या बंगल्याच्या गेटसमोरच घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

फलटण शहर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार मैदान परिसरातील शोभा विनायकराव खलाटे (वय ७१) या शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे व्यायामासाठी चालायला गेल्या होत्या. सकाळी सुमारे पावणे दहा वाजण्याच्या सुमारास त्या आमदारांच्या बंगल्याजवळ पोहोचल्या असता अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील दोन अनोळखी इसम त्यांच्या जवळ आले. त्यापैकी एकाने स्वतःला पोलीस असल्याचे सांगत बनावट ओळखपत्रही दाखविले.

“पुढे चोरी झाली आहे, या भागात सोने-चांदी घालण्यास परवानगी नाही,” असे सांगत त्या इसमाने खलाटे यांना विश्वासात घेतले. त्यानंतर “दागिने काढून सुरक्षित ठेवा” असा सल्ला देत त्यांच्या हातातील सुमारे ३४ ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या. पुढे हातचलाखी करत खऱ्या बांगड्यांऐवजी वेलवेटच्या आवरणातील मेटलच्या बांगड्या वहीच्या कागदात गुंडाळून त्यांच्या पदरात बांधून दिल्या आणि दोघेही तेथून पसार झाले.

काही वेळाने हा प्रकार लक्षात येताच खलाटे यांनी तातडीने फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली. यावरून पोलिसांनी दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोरच अशा प्रकारची घटना घडल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बनावट पोलिसांच्या वाढत्या कारवाया, ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा आणि वाढती चोऱ्यामारी याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी कोणती ठोस पावले उचलणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Spread the love
  • Related Posts

    “आमचा धनगराचा पोरगा आहे म्हणून न्याय मिळणार नाही का?” डॉ. रुपनवरांचे पार्थिव चार तास रुग्णालयाच्या आवारात; लेखी आश्वासनानंतर अंत्यविधीसाठी फडतरीकडे रवाना — नातेवाईकांचा संतप्त सवाल, व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह

    फलटण: (पोपट मिंड) फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या आत्महत्येने केवळ एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला नसून, आरोग्य व्यवस्थेतील संवेदनशीलता, तक्रारींचे गांभीर्य आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीबाबतही गंभीर…

    Spread the love

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी: शिक्षण क्षेत्रात गेली दोन दशके उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या वडले, फलटण येथील सौ. संजीवनी संपत सोनवलकर यांना ग्लोबल इलाइट मीडिया टेक, पुणे…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    “आमचा धनगराचा पोरगा आहे म्हणून न्याय मिळणार नाही का?” डॉ. रुपनवरांचे पार्थिव चार तास रुग्णालयाच्या आवारात; लेखी आश्वासनानंतर अंत्यविधीसाठी फडतरीकडे रवाना — नातेवाईकांचा संतप्त सवाल, व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह

    “आमचा धनगराचा पोरगा आहे म्हणून न्याय मिळणार नाही का?”                                 डॉ. रुपनवरांचे पार्थिव चार तास रुग्णालयाच्या आवारात;       लेखी आश्वासनानंतर अंत्यविधीसाठी फडतरीकडे रवाना — नातेवाईकांचा संतप्त सवाल, व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!
    error: Content is protected !!