फलटण ( आपलं फलटण) ररणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, कृषि महाविद्यालय तसेच श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल, फलटण येथे महिला आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या शिबिरास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर (हॉर्टीकल्चर) व प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण (अॅग्रीकल्चर), सीमा शेडगे (रेक्टर), जीवन शिंदे (अधीक्षक, श्रीमंत मालोजीराजे विद्यार्थी वसतिगृह), शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.शिबिरादरम्यान अभिजीत भालके व डॉ. श्रुती विक्रांत थिटे यांनी विद्यार्थिनींना तसेच महिला कर्मचाऱ्यांना महिला आरोग्य, जीवनशैली व विविध आरोग्य समस्यांबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांना आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा सौ. रझिया शेख, सचिव मारुती टकले, खजिनदार कैफ शेख, श्री. शरद पवार, राज चांदवडकर, संचालिका व माजी मुख्याध्यापिका शाहीन शेख, माया बनसोडे, प्रीती शाह व अनिसा सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.सदर शिबिर अत्यंत नियोजनबद्ध व प्रभावी पद्धतीने पार पडले असून, महिला आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.






