एक मत गावाचे भविष्य ठरवते; विकासाच्या बाजूने उभे रहा — सरपंच सागर अभंग

विडणी (आपलं फलटण)आपले एक मत गावाचे भविष्य ठरवणारे आहे.ते वाया घालवू नका.मत देताना केवळ व्यक्ती नव्हे, तर विकासाची दिशा लक्षात ठेवा.सकारात्मक विचार करून निर्णय घ्या आणि विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हा.
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विडणी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी ग्रामस्थांना विकासाच्या मुद्द्यावर एकजूट होण्याचे आणि सजग मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

मंगळवार, दि. २८ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या या निवडणुकीत विडणी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी भावनिक सादही त्यांनी घातली
गत तीन-साडेतीन वर्षांत गावात झालेल्या विकासकामांचा उल्लेख करताना अभंग म्हणाले की, ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे विडणीमध्ये विकासाची नवे पर्व उभे राहिले आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, तसेच विविध मूलभूत सुविधांच्या उभारणीमुळे गावाचे रूप पालटत आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्याचे काम आपण हाती घेतले आणि त्यात यशही मिळवले.
ज्यांच्या हाती अनेक दशकं सत्ता होती, त्यांनी गावाच्या विकासासाठी अपेक्षित पावले उचलली नाहीत. त्यामुळे गावाचा विकासाचा वेग मंदावला. मात्र, आता परिस्थिती बदलली असून ग्रामस्थांच्या विश्वासामुळे विकासाची गंगा विडणीमध्ये वाहू लागली आहे.
सध्याच्या राजकीय व प्रशासकीय पाठबळाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, गावाच्या पाठीशी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते राज्य व केंद्र सरकारपर्यंत मजबूत साथ उभी आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे मार्गदर्शन लाभत असल्यामुळे विकासकामांना अधिक वेग मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
याच पार्श्वभूमीवर मतदारांना उद्देशून त्यांनी भावनिक आणि ठाम शब्दांत संदेश दिला —
“आपले एक मत गावाचे भविष्य ठरवणारे आहे.
ते वाया घालवू नका.
मत देताना केवळ व्यक्ती नव्हे, तर विकासाची दिशा लक्षात ठेवा.
सकारात्मक विचार करून निर्णय घ्या आणि विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हा.”
या शब्दांत त्यांनी ग्रामस्थांना सजग मतदानाची आवश्यकता पटवून दिली.

ते पुढे म्हणाले, सुरू असलेली विकासकामे थांबू नयेत, उर्वरित प्रश्न मार्गी लागावेत आणि गावाचा सर्वांगीण उत्कर्ष साधावा, यासाठी सक्षम नेतृत्वाची निवड अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने जबाबदारीने मतदान करणे गरजेचे आहे
विडणीचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. विकासाच्या या प्रवासात साथ द्या आणि विडणी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा.
ग्रामपंचायत पोटनिवडणूक ही केवळ राजकीय स्पर्धा नसून गावाच्या भवितव्याचा निर्णायक टप्पा ठरणार असून, या पार्श्वभूमीवर विडणीमध्ये निवडणुकीची रंगत वाढताना दिसत आहे.

Spread the love
  • Related Posts

    विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी सांस्कृतिक पर्वाची मेजवानी!लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा गोंधळ; भव्य दांडिया स्पर्धा अन् आकर्षक बक्षिसांची पर्वणी

    आपलं फलटण : (विडणी प्रतिनिधी) शारदीय नवरात्रोत्सव २०२६ निमित्त विडणी येथे माता-भगिनींसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेले लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा…

    Spread the love

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

     आपलं फलटण प्रतिनिधी “स्थानिक विरोधकांच्या सांगण्यावरून श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा षडयंत्राला बळी पडू नये. सभासदांच्या बळावर आणि लोकांच्या विश्वासाच्या जोरावर श्रीराम सहकारी साखर…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!