फलटण तालुक्यात ‘डिजिटल जनगणना २०२७’ची तयारी पूर्ण : तहसीलदार डॉ.अभिजीत जाधवनागरिकांना स्वयंजणगणनेचे आवाहन

फलटण : देशात प्रथमच होत असलेल्या स्वयंजणगणना आणि डिजिटल पद्धतीच्या भारताची जनगणना २०२७ प्रक्रियेसाठी फलटण तालुका प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या नव्या उपक्रमाअंतर्गत जनगणना दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात मे-जून २०२६ दरम्यान घरगुती माहिती व संसाधन गणना केली जाणार असून, पुढील टप्प्यात नागरिकांची सामाजिक, आर्थिक व लोकसंख्याशास्त्रीय माहिती संकलित केली जाईल.
नागरिकांना स्वयंजणगणना प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन डॉ.अभिजीत जाधव यांनी केले आहे. १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती भरता येणार आहे. या पद्धतीमुळे वेळेची बचत होऊन माहिती अधिक अचूक नोंदवली जाईल.
स्वयंजणगणना करताना नागरिकांनी प्रथम नोंदणी (रजिस्ट्रेशन) करून मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंद करणे आवश्यक आहे. ओटीपीद्वारे पडताळणी केल्यानंतर भाषा निवडून जिल्हा, पिनकोड, गाव किंवा परिसराची माहिती भरून आपले स्थान निश्चित करावे लागेल. त्यानंतर घर व कुटुंबाशी संबंधित सविस्तर प्रश्नावली भरून अंतिम सबमिशन करावे लागेल. एकदा अंतिम सबमिशन केल्यानंतर माहितीमध्ये बदल करता येणार नाही.
माहिती भरल्यानंतर नागरिकांना स्वयंजणगणना ओळख क्रमांक (SID) दिला जाईल. १६ मे ते १५ जून दरम्यान घरभेटीला येणाऱ्या जनगणना कर्मचाऱ्यांना हा क्रमांक दाखवणे आवश्यक राहील.
फलटण तालुक्यात जनगणना प्रभावीपणे राबवण्यासाठी ४९१ गणक गट, ४६८ गणक, ४१ राखीव गणक, ५८ पर्यवेक्षक, ६ राखीव पर्यवेक्षक आणि ८ क्षेत्रीय प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रणाली, माहिती संकलन पद्धती आणि नागरिकांशी संवाद याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे.
यंदा प्रथमच माहिती संकलनासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्यात येणार आहे. जनगणना कायद्यानुसार संकलित केलेली सर्व माहिती गोपनीय राहणार असून ती कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेत पुरावा म्हणून वापरली जाणार नाही.
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, स्वयंजणगणना प्रक्रियेत सहभागी होऊन अचूक व सत्य माहिती द्यावी, ज्यामुळे जनगणना प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि विश्वासार्ह होईल.

स्वयंजणगणना प्रक्रिया चार प्रमुख विभागांत विभागण्यात आली आहे.
पहिला टप्पा – नोंदणी व लॉगिन :
नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर (https://se.census.gov.in⁠�) भेट देऊन राज्य/केंद्रशासित प्रदेश निवडून कॅप्चा भरून लॉगिन करावे लागेल. त्यानंतर घरप्रमुखाचे नाव, १० अंकी मोबाईल क्रमांक आणि ई-मेल (ऐच्छिक) भरून नोंदणी करावी लागेल. एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर एका कुटुंबासाठीच करता येणार असून घरप्रमुखाचे नाव नंतर बदलता येणार नाही.
दुसरा टप्पा – पडताळणी व स्थान निश्चिती :
नोंदणीनंतर नागरिकांनी पसंतीची भाषा निवडून मोबाईलवर आलेल्या ओटीपीद्वारे पडताळणी करावी लागेल. निवडलेली भाषा नंतर बदलता येणार नाही. त्यानंतर जिल्हा, पिनकोड, गाव/शहर/परिसर याची माहिती भरून नकाशावर (Map) लाल चिन्ह (Marker) वापरून आपले अचूक निवासस्थान निश्चित करावे लागेल.
तिसरा टप्पा – माहिती भरणे व अंतिम सादरीकरण :
या टप्प्यात घर व कुटुंबाशी संबंधित सविस्तर प्रश्नावली भरावी लागेल. ‘प्रिव्ह्यू’ पर्यायाद्वारे भरलेली माहिती तपासून आवश्यक बदल करता येतील किंवा ड्राफ्ट सेव्ह करता येईल. मात्र ‘फायनल सबमिट’ केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही. अंतिम सादरीकरणानंतर नागरिकांना ११ अंकी स्वयंजणगणना ओळख क्रमांक (SE ID) एसएमएस किंवा ई-मेलद्वारे प्राप्त होईल.
चौथा टप्पा – क्षेत्र पडताळणी :
यानंतर जनगणना कर्मचारी घरभेटीदरम्यान हा SE ID तपासतील. जर माहिती जुळली तर ती अंतिम मानली जाईल; अन्यथा कर्मचारी नव्याने माहिती नोंदवतील.
फलटण तालुक्यात जनगणना प्रभावीपणे राबवण्यासाठी शेकडो गणक, पर्यवेक्षक आणि क्षेत्रीय प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना डिजिटल प्रणाली, मोबाईल अॅप आणि माहिती संकलनाबाबत विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.

Spread the love
  • Related Posts

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर फलटण पंचायत समिती; रिक्त पदांचा वाढता डोंगर बीडीओ, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त; जूनअखेर आणखी दोन अधिकारी सेवानिवृत्त

    प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर फलटण पंचायत समिती; रिक्त पदांचा वाढता डोंगरबीडीओ, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त; जूनअखेर आणखी दोन अधिकारी सेवानिवृत्त आपलं फलटण( प्रतिनिधी )फलटण पंचायत समितीचा…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा
    error: Content is protected !!