फलटण (आपलं फलटण) माझेरी ता. फलटण येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री मरीमाता देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व मंदिर कलशारोहण सोहळ्याचे आयोजन 23 एप्रिल ते 26 एप्रिल अखेर केले असल्याची माहिती संयोजकांनी दिली असून गावात सर्वत्र भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात दररोज विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. अखंड हरिनाम सोहळा व तुकाराम महाराज गाथा पारायण काळात काकड आरती, प्रवचन, हरिपाठ ,कीर्तन, जागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत असून दररोज अन्नदात्यांकडून अन्नदान केले जाणार आहेत. या भक्तीमय कार्यक्रमात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. अखंड हरिनाम सप्ताहातील प्रवचन व किर्तन सांगणारे ज्ञानदाते गुरुवार दि. 23 रोजी ह. भ. प. राघु बुवा महाराज दिघे. (माझेरी)यांचे प्रवचन व ह.भ.प. बापूराव महाराज लोंढे (संभाजीनगर) यांचे कीर्तन. शुक्रवार दि. 24 रोजी ह.भ.प. योगेश महाराज दिघे (माझेरी) यांचे प्रवचन व ह.भ.प. अशोक महाराज दिघे (माझेरी) यांचे कीर्तन. शनिवार दि. 25 रोजी ह.भ. प. गणेश महाराज शेलार (विडणी) यांचे प्रवचन व ह.भ.प. श्रावणताई वाघमोडे महाराज (रामिष्टेवाडी पाटण) यांचे कीर्तन रविवार दि. 26 रोजी ह.भ.प. गणेशानंद महाराज धुमाळ (धुमाळवाडी) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे या सप्ताहात विविध भजनी मंडळांनी ही सहभाग नोंदवत भक्तीरसाची उधळण केली आहे
कलशारोहण विशेष
श्री मरीमाता देवी मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व मंदिर कलशारोहण सोहळा मठाधिपती प.पू. भगवतगिरी गुरु
आनंदगिरी महाराज शिंगणापूर यांच्या शुभहस्ते गुरुवार दि. 23 रोजी पहाटे पाच ते सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान संपन्न होणार आहे. यावेळी होमहवन प्राणप्रतिष्ठापना व मंदिर कलशारोहण विधी संपन्न होणार आहेत.दुपारी एक वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन माझेरी ग्रामस्थ यांनी केले आहे.






