फलटणमध्ये ‘हेरिटेज संगीत महोत्सव’ची रंगत; दिग्गज कलाकारांची मेजवानी

फलटणमध्ये ‘हेरिटेज संगीत महोत्सव’ची रंगत; दिग्गज कलाकारांची मेजवानी
फलटण (आपलं फलटण) कला प्रसारक संस्था आणि गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथे ‘हेरिटेज संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार व नव्या पिढीपर्यंत त्याची परंपरा पोहोचविण्याच्या उद्देशाने हा महोत्सव साकारला जात असून, शहराच्या सांस्कृतिक ओळखीला नवी उभारी मिळणार आहे.
दि. १७ व १८ एप्रिल रोजी सायं. ६ ते ९ या वेळेत मुधोजी हायस्कूल रंगमंचावर हा महोत्सव पार पडणार आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, अभंग, वाद्यवृंद, जुगलबंदी, नृत्य आणि चित्रपट संगीताचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार आहे.
महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार पं. केदार जाधव यांचे सादरीकरण होणार असून, ‘जादुई पेटी’ हा विशेष कार्यक्रम रसिकांसाठी आकर्षण ठरणार आहे. याशिवाय युवा कलाकार रसिका वैंशंपायन व प्रियांका चौधरी-ढेरंगे, तनमय टेमझरे, कृष्णा भोईटे, सुधीर टेकाळे यांचेही सादरीकरण रंगणार आहे. तसेच नंदिता व निवेदिता देशपांडे यांचे कथक नृत्य रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहे.
या महोत्सवामुळे फलटणमध्ये शास्त्रीय संगीताची नवी परंपरा रुजत असून, स्थानिक तसेच बाहेरील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होत आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love
  • Related Posts

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    फलटण (पुढारी वृत्तसेवा ) स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि फलटण शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धुळदेव (ता. फलटण) परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून ४ किलो ६९…

    Spread the love

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    फलटण (आपलं फलटण )‘फलटण एज्युकेशन सोसायटी’ संचलित स्वायत्त आणि ‘NAAC A’ दर्जा तसेच ‘NBA’ मान्यता प्राप्त ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण’च्या वतीने ३ जून रोजी भव्य ‘मिनी मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
    error: Content is protected !!