महाराष्ट्रात काँग्रेसचे ‘संघटन सृजन अभियान’; तळागाळात पक्ष मजबूत करण्यावर भर

फलटण ( आपलं फलटण)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने देशभरात ‘संघटन सृजन अभियान’ हाती घेतले असून, महाराष्ट्रात हे अभियान पक्षाला तळागाळापर्यंत सक्षम व संघटित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून पक्षाच्या रचनात्मक बळकटीसह कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.
या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात गावपातळीपर्यंत पक्षाची पकड वाढविणे, नवीन कार्यकर्त्यांना संधी देणे तसेच जनसंपर्क वाढविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सदर बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक हिमाचल प्रदेशातील इंदोरा मतदारसंघाचे आमदार मलेंद्र राजन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजयजी बालगुडे, राजेंद्र शेलार, प्रदेश प्रतिनिधी डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके, फलटण तालुका अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, माण तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, फलटण शहर अध्यक्ष पंकज पवार, सेवादल जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष अल्ताफ पठाण, बालमुकुंद भट्टड, तालुका उपाध्यक्ष अशोकराव शिंदे, युवक सेल अध्यक्ष गंगाराम रणदिवे, ताजुद्दीन बागवान, ओबीसी सेल शहर अध्यक्ष विकास ननावरे, अभिजित जगताप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत ‘संघटन सृजन अभियान’ यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Spread the love
  • Related Posts

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    फलटण (पुढारी वृत्तसेवा ) स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि फलटण शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धुळदेव (ता. फलटण) परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून ४ किलो ६९…

    Spread the love

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    फलटण (आपलं फलटण )‘फलटण एज्युकेशन सोसायटी’ संचलित स्वायत्त आणि ‘NAAC A’ दर्जा तसेच ‘NBA’ मान्यता प्राप्त ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण’च्या वतीने ३ जून रोजी भव्य ‘मिनी मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
    error: Content is protected !!