AI-ML अभ्यासक्रमांसह फलटण इंजिनिअरिंग कॉलेज ‘स्वायत्त’; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी संधींचे नवे क्षितिज : आमदार रामराजे यांची माहिती

फलटण ( आपलं फलटण)
फलटणच्या शैक्षणिक विश्वासाठी अभिमानाची ठरावी अशी महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेजला (PESCOE) ‘स्वायत्त संस्था’ (Autonomous Status) दर्जा प्राप्त झाला आहे. ही माहिती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. या मान्यतेमुळे महाविद्यालयाच्या प्रगतीपथावर नवे पर्व सुरू झाले असून, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक, दर्जेदार आणि उद्योगाभिमुख शिक्षणाची दारे अधिक व्यापकपणे खुली झाली आहेत.
आ.रामराजे म्हणाले स्वायत्त दर्जामुळे महाविद्यालयाला आता अभ्यासक्रम रचनेपासून मूल्यमापनापर्यंत स्वतंत्र निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य लाभले आहे. त्यामुळे पारंपरिक शिक्षणपद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन विद्यार्थ्यांना कौशल्याधारित, उद्योगसुसंगत आणि अद्ययावत शिक्षण देणे शक्य होणार आहे. परिणामी, विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होऊन प्लेसमेंटच्या संधी अधिक विस्तारतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगाचा विचार करून आगामी शैक्षणिक वर्षापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स (AI & DS) तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (AI & ML) हे अत्याधुनिक डिप्लोमा व पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय महाविद्यालयाने घेतला आहे. या अभ्यासक्रमांना महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (BATU) यांची मान्यता मिळाली असून, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) यांचीही सकारात्मक शिफारस प्राप्त झाली आहे.
महाविद्यालयाच्या नव्या भव्य इमारतीत सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, हाय-स्पीड इंटरनेट, आधुनिक सेमिनार हॉल्स आणि समृद्ध ग्रंथालय यांसारख्या सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या अत्याधुनिक सुविधांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण स्थानिक पातळीवरच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) मिळालेल्या स्वायत्त दर्जामुळे प्रवेश प्रक्रियेतही महत्त्वपूर्ण बदल होणार असून, यावर्षीपासून सर्व प्रवेश प्रक्रिया ‘ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट’ म्हणून पारदर्शक व सुलभ पद्धतीने राबविण्यात येणार आहे.

प्राचार्य मनोज कुमार दळवी म्हणाले महाविद्यालयात स्वायत्त संस्था दर्जा मिळाल्याने संस्थेने यशाचे सर्वोच्च शिखर गाठले आहे जिल्ह्यातील सर्वोत्तम कॉलेज म्हणून महाविद्यालयाचा लौकिक वाढला असून स्वायत्तेमुळे महाविद्यालयाला उद्योगांच्या गरजेनुसार स्वतःचा आधुनिक अभ्यासक्रम राबवता हा येणार आहे यामुळे नामांकित कंपन्या सोबत थेट सहकार्य वाढवून विद्यार्थ्यांना दर्जेदार प्लेसमेंट मिळणे सुलभ होणार आहे.

प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली प्रा. शांताराम कळेळ, प्रा. दिपाली जाधव, डॉ. दत्तात्रय शिंदे, प्रा. किशोरी कुमठेकर, प्रा. तेजश्री जाधव आदींच्या समर्पित टीमचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच महाविद्यालयाने ही उल्लेखनीय झेप घेतली आहे. या यशाबद्दल आमदार रामराजे नाईक निंबाळकर, रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, संजीव राजे नाईक निंबाळकर, अनिकेत राजे नाईक निंबाळकर तसेच प्रशासन अधिकारी अरविंद निकम आदींनी सर्व टीमचे अभिनंदन केले.
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या या प्रगतीमुळे फलटणची ओळख पश्चिम महाराष्ट्रातील उदयोन्मुख शैक्षणिक केंद्र म्हणून अधिक भक्कम झाली असून, येत्या काळात या संस्थेमधून तंत्रज्ञान क्षेत्रातील कुशल आणि सक्षम मनुष्यबळ घडण्यास मोठा हातभार लागणार आहे.

Spread the love
  • Related Posts

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    आपलं फलटण: मुंबई वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता…

    Spread the love

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!