प्रेमसंबंधाच्या वादातून युवकाची निर्घृण हत्या; चौघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दोघांना घेतले ताब्यात

फलटण ( आपलं फलटण) प्रेमसंबंधाच्या वादातून १८ वर्षीय युवकाची 4-5 जणांनी मिळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना फलटण तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.
मिऱ्याचीवाडी (ता. फलटण) येथील सोमनाथ संदीप जाधव (वय १८) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी आदित्य विजय शिंदे, ओम लोखंडे, विटया लोखंडे, पिंटू लोखंडे (सर्व रा. ढवळ, ता. फलटण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य विजय शिंदे याला व नृसिंह शिंदे यालाही तपासादरम्यान ताब्यात घेण्यात आले आहे. अन्य तिघांचा पोलीस तपास करीत आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ हा एका मुलीशी मोबाईलवरून संपर्कात होता. याच कारणावरून संबंधित मुलीच्या नातेवाईकांना राग होता. १० एप्रिल २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास सोमनाथला फोन करून ढवळपाटी परिसरात बोलावण्यात आले.
दरम्यान, रात्री सुमारे १.१५ वाजता सोमनाथच्या वडिलांना त्याच्याच मोबाईलवरून अनोळखी व्यक्तीने फोन करून “तुमचा मुलगा ढवळपाटी येथे आहे, तातडीने या,” असे सांगितले. वडील तेथे पोहोचल्यावर पुन्हा मिऱ्याचीवाडी कमानीजवळ येण्यास सांगण्यात आले. तेथे लाल रंगाच्या कारमधून सोमनाथसह काही जण उतरले.
“तुमचा मुलगा आमच्या बहिणीशी चॅटिंग करतो, त्याला आम्ही जिवंत ठेवणार नाही,” असे सांगत संबंधितांनी त्याला बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर आणखी दोघे मोटरसायकलवर येऊन सर्वांनी मिळून सोमनाथला लाथा-बुक्क्यांनी तसेच तोंड, छाती व पोटावर मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी तो पळू लागला असता त्याचा पाठलाग करून ढवळपाटी येथील व्यापारी गाळ्यांच्या मागील पटांगणात व मिऱ्याचीवाडी कमानीजवळ पुन्हा मारहाण करण्यात आली.
गंभीर जखमी अवस्थेत सोमनाथला प्रथम फलटण येथील खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी बारामती येथे हलविण्याचा सल्ला दिला; उपचारासाठी पुढे नेण्यास आर्थिक परिस्थिती नसल्याने त्याला घरी नेण्यात आले मात्र नंतर तो काहीच प्रतिसाद देत नसल्याने त्याला पुन्हा फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Spread the love
  • Related Posts

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    आपलं फलटण: मुंबई वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता…

    Spread the love

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!